For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अखेर नागरिकांनीच खड्ड्यांमध्ये टाकला भराव

11:58 AM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
अखेर नागरिकांनीच खड्ड्यांमध्ये टाकला भराव
Advertisement

भातकांडे स्कूलसमोरील रस्त्याची दुर्दशा

Advertisement

बेळगाव : एसपीएम रोडपासून भातकांडे स्कूलपर्यंतचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे. रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे रहिवाशांसोबत वाहनचालकही वैतागले आहेत. प्रशासनाकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण थांबविण्यात आल्याने ये-जा करणेही अवघड झाले आहे. त्यामुळे अखेर नागरिकांनीच या रस्त्यांमध्ये भराव टाकून खड्डे बुजविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून भातकांडे स्कूलसमोरील रस्त्याचे काम प्रलंबित आहे. स्कूलपासून जुना धारवाड रोडपर्यंतचे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले असले तरी एसपीएम रोडपर्यंतचे काम अर्धवट स्थितीत आहे. या ठिकाणी दररोज दोन ते तीन अपघात होत असतानाही रस्ता काँक्रिटीकरणाकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केले आहे.

धुळीमुळे नागरिक त्रस्त

Advertisement

रस्ता पूर्णपणे उखडून गेला असल्याने धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे आसपासच्या दुकानांसह घरांमध्येही धूळ शिरत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पावसाळ्याच्या दिवसात या ठिकाणी पाणी भरत असल्याने वाहनाना ये-जा करणे अवघड होते. अशा धोकादायक रस्त्यावरूनच शालेय विद्यार्थ्यांना ये-जा करावी लागते. त्यामुळे रस्त्याच्या काँक्रीटकरणाची मागणी केली जात आहे.

आतातरी प्रशासनाला जाग येणार का ?

प्रशासनाकडून काँक्रिटीकरण करण्यासंदर्भात प्रतिसाद दिला जात नसल्याने अखेर नागरिकांनीच खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. रविवारी काही नागरिकांनी खड्ड्यांमध्ये भराव टाकून खड्डे बुजविले आहेत.  आतातरी प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

Advertisement
Tags :

.