For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

शेवटी नागरिकांनीच रंगेहाथ पकडले

12:36 PM May 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
शेवटी नागरिकांनीच रंगेहाथ पकडले
Advertisement

विविध चोरी प्रकरणात सहभागी युवक जाळ्यात

Advertisement

बेळगाव : टेंगिनकेरा गल्ली येथील एका दुकानात चोरी करताना एका युवकाला रंगेहाथ पकडून त्याला मार्केट पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. टेंगिनकेरा गल्ली, कामत गल्ली व जुन्या पी. बी. रोड परिसरात चोरीचे प्रकार नित्याचेच झाले होते. बुधवारी सायंकाळी मुकेश ट्रेडिंग या दुकानात चोरी करताना त्याला ताब्यात घेतले. मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. यापूर्वीही वेगवेगळ्या दुकानातून चोरी करताना हा युवक सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. बुधवारी रोकड चोरताना तो रंगेहाथ सापडला. यापूर्वी त्याने कामत गल्ली येथील एका दवाखान्यात 35 हजार रुपये चोरले आहेत. जुन्या पी. बी. रोडवरील एका मंदिरातही चोरी केल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून उघडकीस आले. फुटेजमध्ये स्पष्टपणे त्याचा चेहरा कैद झाला असला तरी प्रत्यक्षात तो सापडला नव्हता. बुधवारी सायंकाळी त्याला रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.