रशियावर युक्रेनचा सर्वात भीषण हल्ला
मॉस्को समवेत 10 शहरांवर एकाचवेळी हल्ले : 3 विमानतळ बंद
वृत्तसंस्था/ मॉस्को
मागील अडीच वर्षापासून रशियाच्या विरोधात सुरू असलेल्या युद्धात युक्रेनने सोमवारी रात्री मॉस्कोवर अत्यंत भीषण हल्ला केला आहे. युक्रेनने 140 हून अधिक ड्रोन्सद्वारे रशियाची राजधानी मॉस्को समवेत अनेक क्षेत्रांना लक्ष्य केले आहे. रशियाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी युक्रेनच्या हल्ल्याची पुष्टी दिली आहे. मॉस्कोनजीक रामेंस्कोए शहरावर ड्रोन हल्ले करण्यात आले असून यात अनेक नागरी इमारतींचे नुकसान झाले असून एका महिलेचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाल्याची माहिती मॉस्को क्षेत्राचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव यांनी दिली आहे.
संबंधित इमारती रिकामी करविण्यात आल्या आहेत. तर हल्ल्यामुळे मॉस्कोनजीकचे तीन विमानतळ वनुकोवो, डोमोडेडोवो आणि जुकोवस्की तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत असे वारोब्योव यांनी सांगितले. रशियाच्या नागरी उ•ाण प्राधिकरणानुसार एकूण 48 विमानांना अन्य विमानतळांच्या दिशेने वळविण्यात आले आहे. तर 30 हून अधिक उ•ाणे रद्द करण्यात आली आहेत. हल्ल्यानंतर विमानतळाबाहेर उभे असलेल्या बसला आग लागली आहे.
मॉस्कोच्या दिशेने येणाऱ्या अनेक ड्रोन्सना आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियाकडून करण्यात आला आहे. 9 रशियन क्षेत्रांमध्ये युक्रेनकडून डागण्यात आलेले एकूण 144 ड्रोन्स नष्ट केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
युक्रेनने मॉस्कोसोबत रशियातील कुर्स्क, बेलगोरोद, क्रालनोडार, वोरोनिश, बर्यांस्क, किरोव, कलुगा, तुला आणि ओर्योल समवेत 10 शहरांवर ड्रोनने हल्ले केले आहेत. हे हल्ले दहशतवादी हल्ल्यांसमान आहेत, कारण यात नागरी सुविधांना लक्ष्य करण्यात आले आहे असा आरोप रशियाने केला आहे. तर रशियाला खोल जखम देणे आणि अंतर्गत भागांमध्ये हल्ला करण्याचा आम्हाला अधिकार आहे, कारण 2022 मध्ये रशियाने आमच्या नागरी वस्त्यांवर हल्ले केल s होते असा दावा युक्रेने केला आहे.
युक्रेन सीमेला लागून असलेल्या ब्रांस्क क्षेत्रात 72 युक्रेनियन ड्रोन रोखण्यात आले आहेत. कुर्स्कच्या आकाशात 14 तर तुलाच्या आकाशात 13 ड्रोन्स नष्ट करण्यात आले. याचबरोबर 5 अन्य भागांमध्ये 25 ड्रोन्स रोखण्यात आल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.