For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युक्रेन लवकरच युरोपियन महासंघात

06:36 AM Jan 28, 2026 IST | Tarun Bharat Portal
युक्रेन लवकरच युरोपियन महासंघात
Advertisement

वृत्तसंस्था / कीव्ह 

Advertisement

येत्या  एक ते दोन वर्षांमध्ये युक्रेनचा समावेश युरोपियन महासंघात केला जाऊ शकेल, असे प्रतिपादन त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी केले आहे. या समावेशाच्या संदर्भात झेलेन्स्की यांनी ऑस्ट्रियाचे चान्सेल ख्रिश्चन स्टॉकर यांच्याशी चर्चा केली असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. युक्रेनच्या महासंघातील प्रवेशाला काही युरोपियन देशांचा विरोध असल्याचे वृत्त आहे. मात्र, या देशांना वळविण्यात यश मिळेल , अशी आशा झेलेन्स्की यांना वाटते. युव्रेनला महासंघात घेण्यास रशियाचाही विरोध आहे. सध्या रशिया आणि युव्रेन यांच्यात युद्ध होत असून ते जवळपास तीन वर्षे चाललेले आहे. त्यामुळे युक्रेनला लागून असणाऱ्या अन्य देशांवरही युद्धाचे सावट आहे, असा त्या देशांचा आरोप आहे. हे युद्ध  थांबल्याशिवाय परिस्थिती  अनुकूल आणि सुरळीत होणार नाही, असे प्रतिपादन काही देशांकडून करण्यात येते. युव्रेनचा समावेश  युरोपिकन महासंघात झाल्यास त्या देशाचा आर्थिक लाभ होऊ शकतो. हा देश युरोपात असूनही महासंघात नाही. तसेच तो नाटो या सामरिक संघटनेचाही सदस्य नाही. युक्रेनच्या नाटो सदस्यत्वालाही रशियाचा विरोध आहे. रशिया आणि युव्रेन यांच्यातील युद्ध थांबविण्यासाठी युरोपातील ब्रिटन, फ्रान्स आदी देश प्रयत्नशील आहेत. भारतानेही अनेकदा हे युद्ध थांबावे, अशी वारंवार मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.