68 क्षेपणास्त्रs, 351 ड्रोन्समुळे हादरले युक्रेन
नाटो परिषदेपूर्वी रशियाचे शक्तिप्रदर्शन : 14 जणांचा मृत्यू
वृत्तसंस्था, कीव्ह
युक्रेन पुन्हा एकदा रशियाच्या हल्ल्यांमुळे हादरले आहे. राजधानी कीव्हवर क्षेपणास्त्रs अन् ड्रोन हल्ले झाले असून यात कमीतकमी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच 46 हून अधिक जण जखमी झाले आहेत. कीव्ह भागाच्या सैन्य प्रशासनाचे प्रमुख तिमुर तकाचेंको यांनी या घटनेची पुष्टी दिली. 20 हून अधिक ठिकाणी बचाव अभियान राबविले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
रशियाने 23 बॅलेस्टिक क्षेपणास्त्रs, 6 सुपरसोनिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांसमवेत एकूण 68 क्षेपणास्त्रs, तसेच 351 ड्रोन्स डागले आहेत. युक्रेनच्या वायुदलाने 37 क्षेपणास्त्रs आणि 326 ड्रोन्सना नष्ट किंवा निष्क्रीय केले होते. परंतु बॅलेस्टिक आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रांना रोखता आले नव्हते. या हल्ल्यानंतर झेलेंस्की यांनी पाश्चिमात्य देशांकडून पॅट्रियल मिसाइल इंटरसेप्टर सिस्टीमची मागणी केली आहे.
रशियाच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांनी अनेक इमारतींचे नुकसान पेले आहे. अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये आग लागली असून गोदाम तसेच कार्यस्थळांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळपर्यंत तीन मोठ्या इमारती कोसळल्या आहेत. बचावकर्मचारी ढिगाऱ्यांखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. तर हेलिकॉप्टरद्वारे पाण्याचा मारा करून आग विझविण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती किव्हरचे महापौर विटाली क्लिट्स्को यांनी दिली.
नाटो शिखर परिषदेची पार्श्वभूमी
रशियाचे हे हल्ले तुर्कियेत होणाऱ्या नाटो शिखर परिषदेपूर्वी झाले आहेत