युक्रेनने रशियावर डागली एटीएसीएमएस क्षेपणास्त्र
मॉस्को :
रशिया आणि युक्रेन यांच्यात मागील तीन वर्षांपासून सुरू असलेला संघर्ष आता भीषण रुप धारण करत आहे. युक्रेनकडून रशियावर मोठ्या संख्येत क्षेपणास्त्रs अन् ड्रोन्स डागण्यात आली आहेत. याप्रकरणी रशियाने कठोर भूमिका घेत सूड उगविणार असल्याचे म्हटले आहे. युक्रेनकडून 8 अमेरिकन एटीएसीएमएस क्षेपणास्त्रs डागण्यात आली होती, ज्यांना आकाशातच नष्ट करण्यात आल्याचा दावा रशियाने केला. रशियाने आता युक्रेनवर प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. वाढलेल्या तणावादरम्यान रशियात सेंट पीटर्सबर्गच्या पुलकोवो विमानतळावरील विमान वाहतूक प्रभावित झाली आहे. तर रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने पूर्व युक्रेनच्या लुहान्स्क क्षेत्रातील नादिया गावावर कब्जा केल्याचा दावा केला आहे. युक्रेनला पाश्चिमात्य देशांकडुन समर्थन मिळत आहे. एटीएसीएमएस क्षेपणास्त्रांच्या वापरामुळे या युद्धात मोठा बदल झाल्याचे रशियाचे मानणे आहे. राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन यांनीही या क्षेपणास्त्राच्या वापराबद्दल संताप व्यक्त केला आहे.