For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रेक्षकांना घायाळ करणार ‘उडता तीर’

06:19 AM Aug 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
प्रेक्षकांना घायाळ करणार ‘उडता तीर’
Advertisement

अभिनेता आयुष्मान खुराना सध्या स्वत:च्या आगामी चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यग्र आहे. मागील काही दिवसांपासून आयुष्मानचा आगामी चित्रपट ‘उडता तीर’चे नाव चर्चेत आहे. या चित्रपटात आयुष्मानसोबत सारा अली खान दिसून येणार आहे. या चित्रपटाद्वारे आयुष्मान आणि सारा यांची जोडी दुसऱ्यांदा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. यापूर्वी दोघांनी ‘पती पत्नी और वो दो’मध्ये काम केले होते. उडता तीर हा चित्रपट 9 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. नवरात्रीच्या पूर्वी हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार असल्याचा खुलासा निर्मात्यांनी केला आहे.

Advertisement

‘उडता तीर’ चित्रपटाची कहाणी विनोदी अन् कौटुंबिक मनोरंजनाची असणार आहे. चित्रपट विनोद, अफरातफरी आणि एक मनोरंजक कौटुंबिक कहाणीचा संगम असणार आहे. याचे चित्रिकरण मुंबई अन् दिल्लीत झाले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकाश ए. कौशिक यांनी केले आहे. तसेच त्यांनीच याची कहाणी लिहिली आहे. करण जौहर, अदार पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचिन जैन यांनी मिळून या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.