बाडग्यांनी हिंदुत्त्वावर बोलू नये- आमदार लाड
आमदार प्रसाद लाड यांच्या उद्धव ठाकरेंवर घाणाघात
कोल्हापूर
डोक्यावर मुस्लमांनी टोपी घातलेल्या बाडग्या उद्धव ठाकरे यांनी देशाच्या पंतप्रधानांना कोणताही प्रश्न विचारण्याचा हक्क गमावून बसलेले आहे. वोट झिहाद च्या माध्यमातून मस्जिदीतून फतवे काढून मतांची भिक मागणारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी देशातील हिंदुवरती बोलावं हे लज्जास्पद आहे. ज्या कै. शिवसेना प्रमुखांनी गर्व से कहो हम हिंदू है म्हणत सांगितलेलं होतं की ज्यावेळी शिवसेनेला कॉंग्रेससोबत जावे लागेल, त्यावेळी शिवसेना नावाच दुकान बंद करेन. त्यामुळे उद्धव ठाकरेंना ते बोलण्याचा अधिकार नाही आहे, असे घाणाघाती वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी कोल्हापूरात केले.
यावेळी आमदार लाड म्हणाले, एकही मंदिर तुटणार नाही, एकही हनुमान मंदिर पाडल जाणार नाही, हा हिंदुना शब्द आहे. अनाधिकृत मस्जिदीवरचा विषय मी आणि नितीश राणेंनी उचलून धरला. मुंबईतल्या १२ मस्जिदींना नोटीस पाठवण्यात आल्या. त्यातही मस्जिदीचं जे जुनं स्टकचर होत त्याबद्दल आमचा काही आक्षेप नव्हता. परंतु त्यावरती तीन - चार मजले कोव्हीडच्या काळात वाढवले गेले, त्याला विरोध आहे.
संजय राऊत यांना एकला चलो रे शिवाय पर्याय नाही. कॉग्रेसला कळून चुकलयं की शिवसेना उद्घव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई, महाराष्ट्रात किती पाठींबा आहे ? त्यामुळे त्यांना कॉंग्रेसच बरोबर घेणार नाही. पवार साहेबांची भूमिका लवकरच कळेल. झूठ बोल पण नीट बोल आणि रेटून बोल ही संजय राऊतांची सवय आहे. ज्या माणासाच्या पाठीचा कणाच मोडलेला आहे त्या माणसाला मिडीया इतकं महत्त्व का देत आहे ?, असे वक्तव्य आमदार प्रसाद लाड यांनी केले.