विरोधक ठरला...उद्धव ठाकरेंच्या आदेशाचे पालन करू ! शाहू महाराजांच्या पाठीशी ठाम राहण्याचा संजयबाबा घाटगे गटाचा निर्धार
व्हनाळी प्रतिनिधी
सध्याच्या बदललेल्या राजकिय समिकरणांचा आणि परिस्थिीतीचा विचार करता संजयबाबा घाटगे गटाचा राजकिय विरोधक आता ठरलेला आहे. त्यामुळे पक्षप्रंमुख उद्धव ठाकरे यांचा आदेश प्रमाण मानून आम्ही काम करू आणि सकारात्मक राजकारणासाठी हर एक परिस्थीतीत हिंद्वी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज व समतेचा महामेरू छत्रपती शाहू महाराज यांचे वंशज छत्रपती शाहू महाराज यांच्या विजयासाठी जिवाचं राण करू असा निर्धार व्हनाळी ता.कागल येथील संजयबाबा घाटगे गटाचे कार्यकर्ते व शिवसैनिकांच्या बैठकीत करण्यात आला.
यावेळी बैठकीच्या अध्यक्षस्थावरून बोलताना संजयबाबा घाटगे म्हणाले, आम्ही राजकिय जिवणात कोणावार विनाकारण पलटवार केले नाहीत. आणि कुणासमोर गुडघेदेखील टेकले नाहीत आम्ही घेतलेला निर्णय ठाम असून शाहू महाराजांच्या विजयासाठी मी व माझे कार्यकर्ते जिवाचे रान करतील. शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीमुळे जिल्ह्यात साकारात्मक राजकारणाची नांदी होईल. छत्रपती शाहूंच्या वंशजांना पाठबळ देवूया. असेही त्यांनी म्हटलं आहे.
माजी आमदार घाटगे पुढे म्हणाले, मला सेनेतून उमेदवारी मिळावी यासाठी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड प्रयत्न केले पंरतू पक्षप्रमुख ठाकरे यांनी शाहूंच्या गादीचा मान राखण्यासाठी हि जागा काँग्रेसला सोडली त्यामुळे त्याची खंत नाही. येत्या निवडणूकीत आम्ही नेटाने कामाला लागू. विरोधक चिडीचूप होतील एवढा मोठा मेळावा आपण लवकरच घेवू असे सांगताना शक्तीपीठ मार्गाला विरोधच राहील याचाही त्यांनी पुनउर्चार केला.
गोकुळचे संचालक अंबरिषसिंह घाटगे म्हणाले, सर्वसामान्यांच्या उद्धारासाठी आम्ही संजयबाबांना खासदारकीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. या राजकिय परिस्थीतीमध्य़े अन्याय- न्याय यामध्ये आम्ही कधीच पडणार नाही. या सर्वापेक्षा तालुक्याचे हित सर्वात महत्वाचे आहे. आमचा राजकिय विरोधक कोण हे आता जवळजवळ ठरलेलं आहे. त्यामुळे ठाकरेंचा आदेश प्रमाण मानून आम्ही शाहू महाराजांच्याच पाठीशी राहू जिल्हाचा खासदार ठरविण्याची ताकद संजयबाबा घाटगे गटात आहे हे कोणीही विसरता कामा नये असे ते म्हणाले.
यावेळी विजय जाधव,वैभव आडके,आनंदा भिऊंगडे,दिलीप चौगले,बाबूराव शेवाळे,विलास पाटील,संभाजी भोकरे,जयसिंग टिकले,युवराज कोईगडे,अशोक पाटील,मुकुंद बोडके,मल्हारी पाटील,के.के.पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
संजयबाबांना उमेदवारी मिळायला हवी होती अशी खंत अनेक कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली परंतू कांहीही असो बाबांचा आदेश शिरसावंद्य माणून त्यांनी सागेल त्या उमेदवाराच्या पाठीशी आम्ही ठाम राहणार असल्याची ग्वाही कार्यकर्त्यांनी दिली.
घाटगेंना अश्रू अनावर...
यावेळी बोलताना धनराज घाटगे म्हणाले, आपल्या गटाने हर एक परिस्थीतीत स्वाभीमानी कार्य़कर्त्यांच्या जीवावर प्रचंड संघर्ष केला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी संजयबाबांच्या उमेदवारीबाबत व्यक्त केलेल्या भावना रास्त असल्या तरी आजुन आपला संघर्ष संपलेला नाही असे सांगताना त्यांना अश्रू आनावर झाले. यावेळी कांही काळ बैठक स्तब्ध झाली. शाहू महाराजांच्या पाठीशी ठाम पणे राहू असे बोलून त्यांनी भाषण थांबवले.