महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

उद्धव ठाकरेंनी घेतली केजरीवाल पत्नीची भेट

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

महाराष्ट्र निवडणुकीच्या संदर्भात तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

Advertisement

शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी गुऊवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांची भेट घेतली. यावेळी उद्धव यांचे पुत्र आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह आणि राघव चढ्ढा हेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे 6 ऑगस्टपासून तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. येथे ते महाराष्ट्र निवडणुकीसंदर्भात ‘इंडिया’ ब्लॉकच्या नेत्यांची भेट घेत आहेत. तसेच काही नेत्यांशी त्यांच्या जागावाटपाबाबतही चर्चा सुरू आहे. बुधवारी त्यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचीही भेट घेतली. लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव यांचा हा पहिलाच दिल्ली दौरा आहे. महाराष्ट्रात यावषी ऑक्टोबरपर्यंत निवडणुका होणार असल्याने विविध पक्षातील नेत्यांमध्ये पक्षांतर्गत जागावाटप आणि उमेदवार निवडीबाबत प्राथमिक बोलणी सुरू झालेली दिसून येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article