For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

गांधी मैदानात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ; महाविकास आघाडीची बुधवार 1 रोजी जाहीर सभा

03:18 PM Apr 29, 2024 IST | Abhijeet Khandekar
गांधी मैदानात धडाडणार उद्धव ठाकरे यांची तोफ  महाविकास आघाडीची बुधवार 1 रोजी जाहीर सभा
Uddhav Thackeray
Advertisement

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती

जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शिवाजी पेठेतील गांधी मैदान येथे तोफ धडाडणार आहे. सभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (शरद पवार गट) सर्वेसर्वा शरद पवार प्रमुख उपस्थित राहणार आहे. बुधवार 1 मे रोजी सभेचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी सहा वाजता सभेस प्रारंभ होईल.

Advertisement

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रीयेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने महायुतीसह महाविकास आघाडीचे प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जिल्ह्यात येवू लागले आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नुकतीच तपोवन मैदान येथे जाहीर सभा झाली. त्यानंतर आता लगेचच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची सभा गांधी मैदान येथे होत आहे. सभेमध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाकडे समस्त राजकीय वर्तुळच लक्ष असणार आहे. त्याचबरोबर सभेस राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, आपचे खासदार संजयसिंह आदी प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.