For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

उद्धव ठाकरेंनी ‘खिचडी चोर’ मैदानात उतरवले ! संजय निरुपम यांची शिवसेनेवर खरपूस टिका

06:02 PM Mar 27, 2024 IST | Abhijeet Khandekar
उद्धव ठाकरेंनी ‘खिचडी चोर’ मैदानात उतरवले   संजय निरुपम यांची शिवसेनेवर खरपूस टिका
Sanjay Nirupam

मुंबई काँग्रेसचे नेते आणि माजी राज्यसभा खासदार संजय निरुपम यांनी शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षावर जोरदार टिका केली आहे. शिवसेना ठाकरे गटाने आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईच्या 4 जागांवर महाविकास आघाडीअंतर्गत चर्चा चालु असताना उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी ठाकरे गटावर आरोप केला. तसेच मुंबई- वायव्य मतदारसंघामध्ये उबाठा पक्षाने खिचडीचोराला तिकिट दिल्याचाही आरोप त्यांनी केला.

Advertisement

महाविकास आघाडी अंतर्गत घटक पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून जागावाटपावर खल चालू आहे. त्यातच शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार आणि राष्ट्रीय काँग्रेस यांना विचारत न घेता सांगलीसह मुंबईतील 4 जागावर परस्पर उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामुळे राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते नाराज झाले असून त्यांनी तशी नाराजीही व्यक्त केली.

दरम्यान, आज मुंबई काँग्रेसचे नेते संजय निरूपम यांनी ठाकरे गटावर जोरदार टिका केला. "मुंबई उत्तर- पश्चिम जागेवर उमेदवार घोषित करून उबाठा- शिवसेनेने 'युती धर्माचे उल्लंघन' केले आहे. शिवसेनेने वायव्य मुंबईतून जो उमेदवार उभा केला आहे त्याजागेवर मी अनेक वर्षापासून प्रतिनिधीत्व करत आहे. शिवसेनेच्या उमेदवाराने कोविड खिचडी घोटाळ्यात कंत्राटदाराकडून लाच घेतली असून त्याची ईडीकडून चौकशी सुरू आहे. शिवसेना मुद्दाम अशा प्रकारचे 'खिचडी चोर' मैदानात उतरवत आहे. शिवसेनेच्या अशा प्रकारच्या कृत्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांना धक्का पोहोचला आहे. शिवसेनेने (यूबीटी) काँग्रेसला दडपण्याचा प्रयत्न केला आहे." असा घणाघात संजय निरुपम यांनी केला.

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले, "शिवसेनेने (UBT) मुंबईतील लोकसभेच्या 6 पैकी 4 जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते अस्वस्थ झाले आहेत. मुंबई काँग्रेसचे नेतृत्व नाराज असल्याने काँग्रेसचे मतदारही नाराज होणार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या या निर्णयाविरोधात भूमिका घ्यावी, अशी मागणी मी आमच्या सर्वोच्च नेतृत्वाकडे करणार असल्याचे बोलून दाखवले.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.