Devendra Fadanvis : उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काही करू शकत नाहीत, मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंना टोला
उद्धव ठाकरे यांच्या ‘दगाबाज रे’ वक्तव्यावर फडणवीसांचा पलटवार
कोल्हापूर : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत, या दौऱ्यात त्यांनी राज्य सरकारवर टीका करताना दगाबाज रे असा शब्दप्रयोग केला होता यावर आता मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर निशाणा साधत उद्धव ठाकरे टोमणे मारण्याच्या पलीकडे काहीही करू शकत नाहीत, पहिल्यांदा उद्धवजी बाहेर पडले आहेत याचा आनंद असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी कोल्हापुरात माध्यमांशी बोलताना लगावला.
राज्य निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकांची घोषणा केली, यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत टीका केली होती यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विरोधकांना एकच उत्तर हवाय निवडणुका पुढे जाण्याचं. निवडणुका घोषित झाले आहेत आम्ही त्यांनी पक्ष म्हणून निवडणुकांना सामोरे जाऊ, त्या त्या स्तरावर निर्णय घेतले जातील, निवडणुकीनंतर या निवडणुकीत राज्यातील जनता आमच्या महायुतीलाच कौल देईल.
उद्धव ठाकरे उद्धव ठाकरेंवर साधला निशाणा..
चार दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर असलेल्या उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजवर नाराजी व्यक्त करत टीका केली होती. उद्धव ठाकरे टीका करण्यापलीकडे काहीही करू शकत नाहीत, त्यांच्या भाषणात एक विकासाचा मुद्दा दाखवा आणि हजार रुपये मिळवा अशी ठाकरेंची स्थिती आहे विरोधी पक्षाला ही निवडणूक पुढे ढकलायची आहे निवडणूक मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने ही निवडणूक घ्यावीच लागणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.