For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

मुंबईत ठाकरे बंधूंची एकजूट; निवडणूक आयोगावर हल्लाबोल; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

06:00 PM Oct 04, 2026 IST | Tarun Bharat Portal
मुंबईत ठाकरे बंधूंची एकजूट  निवडणूक आयोगावर हल्लाबोल  ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी
Advertisement

मुंबई : निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मोठा मोर्चा काढण्यात आला. मेट्रो सिनेमापासून सुरू झालेला मोर्चा मुंबई महानगरपालिका परिसरात पोहोचल्यानंतर जाहीर सभेत परिवर्तित झाला.

Advertisement

या सभेत राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करत सत्ताधारी भाजपवरही जोरदार टीका केली. एसआयआर प्रक्रिया तातडीने थांबवावी आणि भविष्यातील निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली.

निवडणुकीच्या माध्यमातून सत्तेवर कोणाला आणायचे, याचा निर्णय मतदारांनीच घ्यावा, निवडणूक यंत्रणेने नव्हे, असे राज ठाकरे म्हणाले. निवडणूक प्रक्रियेबाबत जनतेच्या मनात कोणताही संभ्रम राहू नये यासाठी संपूर्ण व्यवस्था पारदर्शक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

महाराष्ट्रात राबविण्यात आलेल्या एसआयआर प्रक्रियेवरही त्यांनी आक्षेप घेतला. मोठ्या संख्येने मतदारांची नावे वगळली गेल्याचा दावा करत या प्रक्रियेची फेरतपासणी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मतदान यंत्रांऐवजी पारंपरिक पद्धतीने मतदान घेतल्यास निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यान महाराष्ट्रातील मतदारसंख्येत झालेल्या वाढीचाही राज ठाकरे यांनी उल्लेख केला. मतदारसंख्या वाढण्यामागील कारणे स्पष्ट करण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला.

दरम्यान, या मोर्चामुळे मुंबईतील राजकीय वातावरण ढवळून निघाले असून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संयुक्त आंदोलनामुळे राज्याच्या राजकारणात नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे.

Advertisement
Tags :

.