For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara News | वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना डोळ्यातील अश्रू अनावर

04:42 PM Mar 04, 2026 IST | NEETA POTDAR
satara news   वडिलांच्या स्मृतींना नमन करताना उदयनराजेंना डोळ्यातील अश्रू अनावर
Advertisement

                               उदयनराजेंकडून वडिलांना आदरांजली

Advertisement

सातारा - साताऱ्याच्या ऐतिहासिक भूमीत आज भावनांचा एक हळवा क्षण अनुभवायला मिळाला. कोडोली येथील छत्रपती प्रतापसिंह महाराज आयुर्वेदिक उद्यानात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या शिल्पास पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले स्वतः उपस्थित होते. शिल्पासमोर उभे राहून वडिलांच्या स्मृतींना नमन करताना त्यांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले. काही क्षण ते निःशब्द उभे राहिले… चेहऱ्यावर दुःख, डोळ्यांत आठवणी आणि मनात वडिलांची उणीव स्पष्ट जाणवत होती.वडिलांचा हात डोक्यावर नसल्याची जाणीव आज पुन्हा एकदा तीव्र झाली…

Advertisement

प्रतापसिंह महाराजांच्या शिल्पाकडे पाहताना उदयनराजे भावूक झाले. त्या क्षणी एक खासदार नव्हे, तर आपल्या वडिलांची आठवण काढणारा मुलगा दिसत होता.या वेळी सातारा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष, नगरसेवक आणि स्थानिक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण वातावरणात एक भावनिक शांतता पसरली..प्रतापसिंह महाराजांची परंपरा, त्यांचा वारसा आणि त्यांची शिकवण पुढे नेण्याचा निर्धार करत उदयनराजेंनी वडिलांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन केले…

Advertisement
Tags :

.