महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

सातारा मतदारसंघात उदयनराजे भोसले उमेदवार

06:10 AM Apr 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भाजपकडून उमेदवारांची 12 वी यादी जाहीर : बृजभूषण यांच्या मतदारसंघांबद्दल अद्याप सस्पेन्स

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने स्वत:च्या उमेदवारांची 12 वी यादी मंगळवारी जारी केली आहे. या यादीत 7 उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे. यात महाराष्ट्रातील सातारा मतदारसंघाचा समावेश असून येथे उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर पंजाबमधील 3, उत्तरप्रदेशातील 2 आणि पश्चिम बंगालमधील एका मतदारसंघातील उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. उत्तरप्रदेशातील देवरिया आणि फिरोजाबाद येथील उमेदवार घोषित करण्यात आला आहे. तर बृजभूषण शरण सिंह यांच्या कैसरगंज मतदारसंघाबाबत पक्षाने अद्याप कुठलाच निर्णय घेतलेला नाही.

भाजपने अपेक्षेप्रमाणे सातारा मतदारसंघात छत्रपती उदयनराजे भोसले यांनाच उमेदवारी दिली आहे. मागील लोकसभा निवडणुकीत उदयनराजे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर या मतदारसंघात विजय मिळविला होता. परंतु नंतर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजय मिळविला होता. यावेळी या मतदारसंघात महायुतीच्या वतीने उदयनराजे निवडणूक लढविणार आहेत. तर महाआघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)ने शशिकांत शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. उदयनराजे सध्या राज्यसभा खासदार आहेत.

पंजाबच्या खडूर साहिब येथे मंजीत सिंह मन्ना मियाविंड, होशियारपूर येथे अनिता सोम प्रकाश तर भटिंडा येथे परमपाल कौर सिद्धु यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याचबरोबर उत्तरप्रदेशातील देवरिया येथे शशांक मणि त्रिपाठी तर फिरोजाबाद येथे ठाकूर विश्वदीप सिंह हे भाजपचे उमेदवार असतील. पश्चिम बंगालच्या डायमंड हार्बर मतदारसंघात भाजपने अभिजीत दास यांना तिकीट दिले आहे. या मतदारसंघात त्यांचा मुकाबला तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि वर्तमान खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यासोबत होणार आहे.

उत्तरप्रदेशातील देवरिया मतदारसंघात वर्तमान खासदार रमापति राम त्रिपाठी यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. त्यांच्या जागी शशांक मणि त्रिपाठी हे निवडणुकीच्या मैदानात असणार आहेत. शशांक यांचे वडिल प्रकाश मणि त्रिपाठी हे खासदार राहिले आहेत. याचबरोबर फिरोजाबाद मतदारसंघात वर्तमान खासदार चंद्र सेन  जादौन यांचे तिकीट कापण्यात आले आहे. त्यांच्याऐवजी पक्षाने क्षत्रिय चेहरा ठाकूर विश्वदीप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.

भाजप उत्तरप्रदेशातील 75 जागा लढवत असून यातील 73 उमेदवार जाहीर झाले आहेत. आता केवळ रायबरेली आणि कैसरगंज येथील उमेदवार जाहीर व्हायचा आहे. रायबरेलीत काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यावर भाजप स्वत:चा उमेदवार घोषित करणार असल्dयाचे मानले जात आहे. तर कैसरगंजमध्ये वर्तमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावरून सस्पेन्स अद्याप कायम आहे. परंतु त्यांनी दुसरीकडे निवडणूक प्रचारही सुरू केला आहे.

पंजाबमध्ये कुणाला संधी?

भाजपने भटिंडा मतदारसंघात माजी आयएएस अधिकारी परमाल कौर सिद्धू यांना उमेदवारी दिली आहे. सिद्धू यांनी अलिकडेच राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या राजीनाम्यावरून वादही झाला होता. पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान  यांनी अद्याप त्यांचा राजीनामा मंजूर झाला नसल्याने त्या कुठल्याही पक्षात सामील होऊ शकत नाहीत असा दावा केला होता. परमाल कौर सिद्धू या अकाली दलाचे नेते सिकंदर सिंह मल्लुका यांच्या सून आहेत. भटिंडा येथे त्यांच्यासमोर अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर बादल यांचे आव्हान असणार आहे. आम आदमी पक्षाने येथे गुरमीत सिंह खुड्डियां यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसच्या वतीने जीत मोहिंदर सिंह सिद्धू मैदानात आहेत. होशियारपूरमध्ये भाजपने वर्तमान खासदार सोम प्रकाश यांच्या ऐवजी त्यांच्या पत्नी अनिता यांना उमेदवारी दिली आहे. सोमप्रकाश सध्या केंद्रीयमंत्री आहेत. तर खडूर साहिब येथे पक्षाने मंजीत सिंह मन्ना यांना संधी दिली आहे. मन्ना हे पूर्वी अकाली दलात होते.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article