For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

साताऱ्याच्या गणेश विसर्जनात उदयनराजेंचा हटके अंदाज; व्हिडीओ कॉलवरून कॉलर उडवली

12:19 PM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
साताऱ्याच्या गणेश विसर्जनात उदयनराजेंचा हटके अंदाज  व्हिडीओ कॉलवरून कॉलर उडवली
Advertisement

सातारा : सातारा शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांचा हटके अंदाज पुन्हा एकदा पाहायला मिळाला. प्रत्यक्ष मिरवणुकीत सहभागी होता न आल्याने उदयनराजेंनी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून गणेशभक्तांशी संवाद साधत मिरवणुकीतील उत्साहाचा अनुभव घेतला.

Advertisement

विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त आणि तरुण सहभागी झाले होते. यावेळी एका कार्यकर्त्याने उदयनराजेंना व्हिडीओ कॉल केला. त्यांनी कॉल स्वीकारत मिरवणुकीतील वातावरणाची माहिती घेतली. यावेळी उपस्थित गणेशभक्तांकडून उदयनराजेंच्या नावाचा जयघोष करण्यात आला. गाण्यांच्या तालावर तरुणाईचा उत्साहही शिगेला पोहोचला होता.

मिरवणुकीतील हा उत्साह पाहून उदयनराजेंनी आपल्या परिचित शैलीत ‘कॉलर फ्लिप’ करत व्हिडीओ कॉलवरूनच गणेशभक्तांना अभिवादन केले. तसेच उपस्थितांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. उदयनराजेंचा हा अंदाज पाहून मिरवणुकीतील कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Advertisement

दरम्यान, उदयनराजेंच्या ‘कॉलर फ्लिप’चा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. प्रत्यक्ष मिरवणुकीत उपस्थित राहता आले नसले तरी व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून त्यांनी गणेशभक्तांशी साधलेला संवाद आणि त्यांचा खास अंदाज लक्षवेधी ठरला.

Advertisement
Tags :

.