For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Uday Samant | दिल्लीतील 'त्या' भेटीचे पडसाद महाराष्ट्रात उमटणार? उदय सामंत आणि माजी राष्ट्रपतींच्या चर्चेने वेधले लक्ष!

12:44 PM May 07, 2026 IST | NEETA POTDAR
uday samant   दिल्लीतील  त्या  भेटीचे पडसाद महाराष्ट्रात उमटणार  उदय सामंत आणि माजी राष्ट्रपतींच्या चर्चेने वेधले लक्ष
Advertisement

                              रत्नागिरीत राजकीय भेट; उदय सामंत-रामनाथ कोविंद चर्चा

Advertisement

रत्नागिरी: राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. देशाच्या सर्वोच्च पदावर राहिलेल्या कोविंद यांच्या प्रदीर्घ अनुभवाचा लाभ राज्याच्या आगामी वाटचालीसाठी घेण्याच्या उद्देशाने ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे. या भेटीत राज्याच्या औद्योगिक विकासासह मराठी भाषेच्या संवर्धनावरही सकारात्मक चर्चा झाली.

या भेटीनंतरच्या बैठकीत राज्याच्या विविध सामाजिक आणि राजकीय विषयांवर मंथन झाले. यावेळी उदय सामंत यांच्यासोबत राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आणि आमदार सुहास कांदे यांचीही उपस्थिती होती.रामनाथ कोविंद यांनी केले मार्गदर्शन माजी राष्ट्रपती कोविंद यांनीपल्या प्रदीर्घ प्रशासकीय आणि सार्वजनिक जीवनातील अनुभवातून महाराष्ट्रातील नेत्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.

Advertisement

जनसेवेला नवी दिशा देणारे विचार
माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणे हा माझ्यासाठी ऊर्जादायी अनुभव होता. केवळ राजकीयच नव्हे, तर सामाजिक आणि प्रशासकीय विषयांवरील त्यांचे विचार आम्हाला जनसेवेच्या कार्यात नवी दिशा देणारे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग राज्याच्या प्रगतीसाठी नक्कीच होईल असे सामंत यांनी म्हटले आहे.

Advertisement
Tags :

.