उदय सायनाक यांना भारत बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड
बेळगाव : प्राईम टाईकोन मीडिया ग्रुपतर्फे आयोजित कार्यक्रमात मुख्य अतिथी मराठी सिनेअभिनेते अंकुश चौधरी यांच्या हस्ते बेळगावचे प्रतिष्ठित उद्योजक, निधी ग्रुपचे चेअरमन उदय बाबुराव सायनाक यांना भारत बिझनेस अचिव्हर्स अवॉर्ड 2025 चे सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा 11 जानेवारी रोजी लेमन ट्री या पंचतारिक हॉटेल पुणे येथे पार पडला. या सोहळ्यात अनेक उद्योजक व अतिथी उपस्थित होते. यावेळी वेगवेगळ्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
बेळगाव जमीन नूतनीकरणात उदय सायनाक यांना त्यांचे मोठे बंधू दीपक बा. सायनाक व लहान बंधू विलास बा. सायनाक यांची मोठी साथ लाभली. त्यांच्या आई-वडिलांच्या आशीर्वादाने तसेच त्यांच्या बहिणींच्या व कुटुंबाच्या सहकार्याने निधी ग्रुपने मोठे यश गाठले. निधी ग्रुपच्या यशामागे कंपनी कर्मचारी यांचे अथक प्रयत्न व ग्राहकांच्या विश्वासाचा मोठा वाटा आहे. उदय बाबुराव सायनाक यांनी निधी ग्रुपचे सर्व यश रेड्डी गणपतीच्या चरणी अर्पण केले आहे. निधी ग्रुपच्या बहुमोल यशामागे बेळगावमधील टॅक्स कन्सलटंन्ट सुनील डी. कलबुर्गी व ज्येष्ठ डिस्ट्रिक्ट बाँड रायटर इक्बाल मुल्ला यांची साथ लाभली.