महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उचगाव ग्रामस्थांनी भरघोस मतदान करून साथ द्या

10:39 AM Apr 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे आवाहन

Advertisement

बेळगाव : गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये उचगाव ग्रामस्थांनी भरघोस मतदान करून आशीर्वाद दिला आहे. यावेळीही मृणाल हेब्बाळकर यांना भरघोस मतदान करून निवडून द्यावे आणि सेवा करण्याची संधी द्यावी, असे आवाहन महिला व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. गुढीपाडव्याच्या निमित्ताने उचगाव येथील गणपती मंदिराला भेट देऊन पूजा केली. यानंतर गावामध्ये मतदानासाठी प्रचारफेरी काढली. या दरम्यान महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, उमेदवार मृणाल हेब्बाळकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या प्रचारफेरीत सहभाग घेतला होता. विधानसभा निवडणुकीमध्ये उचगाववासीयांनी आपल्याला भरघोस मतदान करून निवडून दिले आहे. अशाच प्रकारे आता मृणाल हेब्बाळकर यांनाही ग्रामस्थांनी साथ द्यावी, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी युवराज कदम, ग्राम पंचायत अध्यक्षा मथुरा तेरसे, बाळकृष्ण तेरसे, बाळासाहेब देसाई, नीलकंठराज गोळकर, इमाम ताशिलदार, जावेद जमादार, राम कदम, प्रफुल्ल चौगुले, शशिकांत जाधवसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article