साहित्य संमेलनासाठी उचगाववासीय सज्ज
उद्या आयोजन : चार सत्रांमध्ये होणार साहित्य संमेलन
वार्ताहर /उचगाव
उचगाव मराठी साहित्य अकादमी आयोजित 23 वे मराठी साहित्य संमेलन रविवार दि. 12 जानेवारी रोजी अनेक नामवंत आणि दिग्गज साहित्यिकांच्या उपस्थितीत होणार आहे. उचगाव नगरीत ख्यातनाम साहित्यिक, कवी, विचारवंत यांच्या उपस्थितीत साहित्य संमेलनाचा हा सोहळा दिमाखात पार पाडण्यासाठी आता उचगाववासीय सज्ज झाले आहेत. हे साहित्य संमेलन चार सत्रांमध्ये होणार असून अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील प्रसिद्ध साहित्यिक, चित्रपट, गीतकार, कवी, पटकथा संवाद लेखक, चरित्र अभिनेते बाबासाहेब सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार असून पहिल्या सत्रात त्यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. दुसऱ्या सत्रात देवाची आळंदी येथील सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्थेमध्ये चौथीच्या वर्गात शिकणारा आणि दहा वर्षे वय असणारा हरिभक्त पारायण माउली महाराज जाहूरकर हा बाल प्रवचनकार म्हणून उपस्थित राहून ‘संत साहित्य’ यावर आपल्या विनोदी शैलीमध्ये विचार मांडणार आहे.
सालाबादप्रमाणे यावर्षीही दुपारी उचगावच्या मध्यवर्ती गणेश-विठ्ठल रखुमाई मंदिराच्या प्रांगणातील गांधी चौकात सर्वांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यानंतर तिसऱ्या सत्रात हास्य कवी संमेलन असणार आहे. पनवेल तालुक्यातील आणि रायगड जिह्यातील दुर्गेश सोनार आणि जालना अकोला येथील अनंत राऊत हे कवी संमेलनामध्ये आपल्या विनोदी कविता सादर करणार आहेत. चौथ्या सत्रामध्ये साहित्य संमेलनाची सांगता ही हास्याने केली जाते. यावर्षीही या सत्रात विनोदी असे प्रबोधनपर भाऊड सादर करण्यासाठी देवाची आळंदी, पुणे येथील एक प्रसिद्ध विनोदी भाऊडकार गोविंद महाराज गायकवाड हे उपस्थित राहणार असून चौथ्या सत्रात त्यांचा विनोदी प्रबोधन भाऊडाचा कार्यक्रम होणार आहे. या चार सत्रांमध्ये होणाऱ्या या साहित्यपूर्ण अशा संमेलनाला बेळगाव, खानापूर, चंदगड, निपाणी या सर्व तालुक्यातील साहित्यप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून या दिग्गज अशा साहित्यिक, कवींच्या विचारांचा लाभ घ्यावा, असे उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्यावतीने अकादमीचे अध्यक्ष लक्ष्मणराव होनगेकर, उपाध्यक्ष कृष्णाजी कदम पाटील, सेक्रेटरी एन. ओ. चौगुले, कार्याध्यक्ष बाळासाहेब देसाई यांनी कळविले आहे.
संमेलनाचे अध्यक्ष बाबासाहेब सौदागर (चित्रपट गीतकार, पटकथा, संवाद लेखक व चरित्र अभिनेते.)
बाबासाहेब सौदागर यांनी 78 पेक्षा जास्त लोकप्रिय मराठी चित्रपट गीतांचे लेखन केले आहे. त्यापैकी सत्ताधीश, झुंजार, सवत, झुंज एकाकी, जय हिंद, धरणी आईची माया, धाव मन्या धाव, नातं मामा भाचीचं, बहीण माझी भाग्यवान, लग्नाची वरात लंडनच्या घरात, मी सिंधुताई सपकाळ अशा अनेक चित्रपटात गीतलेखन केले आहे. गीतलेखन केलेल्या लोकप्रिय मालिका- आशा अभिलाषा, इनमिन साडेतीन, ऋणानुबंध, चिमणी पाखरं, बंदीशाळा, स्वराज्य रक्षक संभाजी आदी. त्यांनी अभिनय क्षेत्रामध्येही अनेक चित्रपटाद्वारे योगदान दिले आहे. गणगौळण झाली, सूर घुंगराच्या नादात, मी सिंधुताई सपकाळ, तुझा दुरावा शिवा यासारख्या चित्रपटांमध्ये 500 हून अधिक गीतांच्या ध्वनीमुद्रीका, प्रकाशित पुस्तके, सांजगंध कवितासंग्रह, पिवळण कवितासंग्रह, भंडारभूल कथासंग्रह, चित्ररंग चित्रपट गीताचा संग्रह, पाचपोळ लोकप्रिय आत्मचरित्र तसेच अनेक पुरस्काराने सन्मानित. मराठवाडा बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद, शब्दगंध साहित्य संमेलनाचे पाहिले अध्यक्षपद भूषविले.
ह.भ.प. माउली महाराज जाहूरकर (बाल कीर्तनकार व समाज प्रबोधनकार)
ह.भ.प. माउली महाराज जाहूरकर यांचा जन्म 15 ऑगस्ट 2014 साली आळंदी देवाची, तालुका खेड, जिल्हा पुणे येथे झाला. सहाव्या वर्षापासून अध्यात्मात प्रवेश करून कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञानोबाराय, तुकोबाराय यांची माहिती महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, तेलंगणा व कर्नाटकात झेंडा फडकावला. आळंदी येथील सुवर्णाताई खाडे वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असून वय अवघे 10 वर्षे आहे. कमी वयात झी टॉकीज वाहिनीवर सुप्रसिद्ध झाले व महाराष्ट्रातील बालकीर्तनकारातील सर्वांचे लाडके कीर्तनकार व समाजप्रबोधनकार म्हणून परिचित आहेत.
कवी दुर्गेश दिगंबर सोनार (मु. कामोठे, ता. पनवेल, जिल्हा रायगड)
वयाच्या नवव्या वर्षापासून कविता लेखन. पंढरपूरमधील आध्यात्मिक, धार्मिक वातावरणाचे कवितेवर संस्कार, छंदोबद्ध कविता लिहिण्याकडे सुऊवातीपासूनच कल. अनेक कवी संमेलनात सहभाग व अध्यक्षपद, अकोला येथे 15 जानेवारी 2017 रोजी झालेल्या पहिल्या राज्यस्तरीय युवा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले. अनेक नियतकालिकामधून कविता आणि इतर लेखन प्रकाशित, अनेक विषयावर व्याख्याने दिली आहेत. तसेच अनेक नामवंतांच्या प्रकट मुलाखतीचे कार्यक्रम. मुंबई आणि पुणे आकाशवाणी केंद्रावरून व्याख्यानाचे कार्यक्रम. प्रकाशित साहित्य - 1999 ला अक्षरांती काव्यसंग्रह, 2012-अनेकदा असं होतं-2020 ला मोरपीस आणि पिंपळपान, कविता संग्रहांना पुरस्कार. पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य अकादमीचे नारायण सुर्वे पुरस्काराने सन्मानित केले आहे. आतापर्यंतच्या कारकीर्दीबद्दल पुण्यातील ग्रामकन्या प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या सुवर्णरत्न 2024 साली सुवर्णरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा अनेक साहित्य पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
कवी अनंत विठ्ठल राऊत (विदर्भातील अकोला जिल्ह्यातील व्याळा)
नव्या दमाचा कवी म्हणून तऊणांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. आजवरच्या मराठी, साहित्य विश्वात त्यांच्या कविता जास्त लोकप्रिय झालेल्या आहेत. त्यांच्या कविता त्याचे शब्द मनोरंजन नाही तर प्रबोधन आणि परिवर्तन करत आहेत. साहित्याच्या एवढ्या उंचीवर असणारा मणूस शिक्षणानेसुद्धा उच्च विद्याविभूषित आहे. श्ऊाम्प् हुंग्हीग्हु झालेले व्यक्ती चांगल्या पात्रतेची नोकरी सोडून स्वत:ला समाजप्रबोधनासाठी वाहून घेतो हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. अनेक कवी संमेलनामध्ये अतिशय कमी वयामध्ये अध्यक्षपद भूषविले आहे. तेवढेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात अनेक कवी संमेलनामध्ये सरांचा सहभाग असतो. त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
ह.भ.प. गोविंद महाराज गायकवाड(आळंदी देवाची)
गोविंद महाराज हे समाजप्रबोधनकार असून महाराजांनी अनेक तऊणांना आपल्या कार्यक्रमांतून व्यसनमुक्त केले आहे, मराठी विषयामध्ये एम. ए. असून गेल्या पंधरा वर्षापासून महाराज कीर्तन व भाऊड यांच्या माध्यमातून समाजप्रबोधन व जनजागृती करत आहेत. व्यसनमुक्त युवक, स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळी, शिक्षणाचे महत्त्व, निसर्गाचे संवर्धन असे विविध सामाजिक विषय निवडून त्यांनी आपला भाऊड व कीर्तन या माध्यमातून आपल्या विनोदी शैलीमधून लोकांना प्रबोधन केले आहे. उत्तम लेखक व अभिनयाचीदेखील त्यांना आवड आहे. कमी वयामध्ये महाराजांनी भाऊड या क्षेत्रामध्ये आपले नाव मोठे केले आहे. अनेक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. आजपर्यंत त्यांचे 3200 हून अधिक भाऊडाचे प्रयोग झाले आहेत.