For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उचगाव लक्ष्मीयात्रा 2026 मध्ये भरविणार

10:24 AM Apr 08, 2024 IST | Tarun Bharat Portal
उचगाव लक्ष्मीयात्रा 2026 मध्ये भरविणार
Advertisement

बैठकीत ग्रामपंचायत सदस्य, पंचकमिटी, पदाधिकारी,  ग्रामस्थांच्या सर्वसंमतीने निर्णय

Advertisement

वार्ताहर /उचगाव

उचगाव गावाला ऐतिहासिक परंपरा लाभलेली आहे. वडिलोपार्जित जी लक्ष्मीयात्रा भरवण्याची रूढी, परंपरा गावात आहे ती खंडित न होता, उचगावची लक्ष्मीयात्रा भरवण्यासाठी सर्व ग्रामस्थांचे सहकार्य महत्त्वाचे आहे, असे मत बुडाचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांनी उचगाव येथील लक्ष्मीयात्रा भरविण्याच्या संदर्भात घेण्यात आलेल्या बैठकीत आपले मत व्यक्त केले. यावेळी ही यात्रा 2026 मध्ये भरविण्याचा निर्णय घेण्यात आला. उचगाव येथील गांधी चौकातील मध्यवर्ती गणेश विठ्ठल रखुमाई मंदिरामध्ये रविवार 7 एप्रिल रोजी सकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला गावातील युवकांनी तसेच वयस्कर व्यक्तींनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावून आपली मते मांडली. बैठकीला गावातील ग्रा.पं. आजी-माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, युवक मंडळाचे अनेक पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते. बाळासाहेब देसाई यांनी यात्रेमागचा हेतू स्पष्ट केला. लक्ष्मीयात्रा सन 2025, 26 कि 27 साली भरवायची याबाबत ग्रामस्थांमध्ये एकमत होत नव्हते. यावेळी बैठकीचे अध्यक्ष व सभेतील बहुसंख्य ग्रामस्थांच्या एकमताने अखेर सन 2026 हा मध्य काढून यावर्षी लक्ष्मीयात्रा भरविण्याचे बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आले. बैठकीमध्ये लक्ष्मीदेवीच्या गदगेवर बसविण्याच्या जागेसंदर्भात चर्चा करण्यात आली. यावेळी बैठकीत पूर्वापार वडिलोपार्जित ज्या जागेत लक्ष्मीदेवी गदगेला बसविण्यात येते होती. त्याच जागेत लक्ष्मीदेवीला गदगेला बसविण्यात यावी, अशी सर्व ग्रामस्थांनी मागणी केली. यावेळी सदर मुद्दा संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे सर्वांनुमते ठरविण्यात आले. याबरोबरच या लक्ष्मीयात्रेचा संपूर्ण कारभार, जबाबदारी पेलण्यासाठी आणि यात्रा यशस्वी करण्यासाठी म्हणून अनुभवी कमिटी नेमण्यात यावी, असे ठरविण्यात आले.

Advertisement

Advertisement
Tags :

.