For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उभादांडा गणपतीचा जत्रोत्सव उद्या

10:58 AM Feb 04, 2026 IST | अनुजा कुडतरकर
उभादांडा गणपतीचा जत्रोत्सव उद्या
Advertisement

वेंगुर्ले (वार्ताहर)-

Advertisement

उभादांडा वाघेश्वरवाडी येथील दिवाळी लक्ष्मीपूजन दिवशी पूजनास विराजमान करण्यात आलेल्या आणि होळी पौर्णिमेच्या अगोदर एक दिवस विसर्जन होणाऱ्या अशा सुप्रसिद्ध व जागृत अशा गणपती मंदिरातील गणपतीचा प्रतिवर्षी प्रमाणे वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दि. ५ फेब्रुवारी होणाऱ्या संकष्ट चतुर्थी दिवशी साजरा होणार आहे.नवसाला पावणारा आणि भक्तांच्या हाकेला धावणारा अशा या उभादांडा गणपती मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे माघ कृष्ण संकष्ट चतुर्थी दिवशी जत्रोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा होतो. याजत्रोत्सवादिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोल्हापूर, मुंबई व गोवा येथील भाविक आपले नवस या दिवशी फेडण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. सकाळी श्री गणपती मंदिरात श्री सत्यनारायणाची महापूजा मानकऱ्यांमार्फत संपन्न झाल्यानंतर, देवतेस केळी, नारळ, अगरबत्ती, फुले, दुर्वा तसेच पेढे, तळलेले किंवा उकडीचे मोदक, तेल अर्पण करून नवस फेडला जातो. रात्री उशिरा बाबी कलिंगण दशावतार नाट्य मंडळाचे दशावतारी नाटक होणार आहे.प्रतिवर्षी होणाऱ्या या श्री गणपती देवाच्या वार्षिक जत्रौत्सवाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा असे आवाहन श्री गणपती मंदिर देवस्थान उभादांडाचे मानकरी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.