For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युएईमधील भुताचा महाल पुन्हा विक्रीसाठी!

06:45 AM Sep 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
युएईमधील भुताचा महाल पुन्हा विक्रीसाठी
Advertisement

रास अल खैमाह :

Advertisement

संयुक्त अरब अमिरातीमधील (युएई) अल कासिमी पॅलेस पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. रास अल खैमाहमधील हा भव्य राजवाडा स्थानिक पातळीवर हॉन्टेड पॅलेस अर्थात भुताचा महाल म्हणून ओळखला जातो. अनेक वर्षे बंद आणि निर्जन राहिल्याने या महालाभोवती अनेक रहस्यमय कथा आणि अफवा पसरल्या. आता हा ऐतिहासिक महाल विक्रीसाठी उपलब्ध झाला असून त्याची किंमत तब्बल 2.25 कोटी दिरहम, म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 58.7 कोटी ऊपये ठेवण्यात आली आहे. महालातील मूळ फर्निचर, कलाकृती आणि संग्रहित वस्तूंसह किंमत 2.35 कोटी दिरहम म्हणजे सुमारे 61.3 कोटी ऊपये आहे.

35 बेडरूमचा चार मजली महाल

Advertisement

अल कासिमी पॅलेस हा साधासुधा बंगला नसून तब्बल 35 बेडरूम असलेला चार मजली महाल आहे. सुमारे 1,91,742 चौरस फूट जागेवर हा राजवाडा उभारण्यात आला असून त्याचे बांधकाम क्षेत्रफळ सुमारे 33,827 चौरस फूट आहे. भव्य वास्तूशैली, मोठे हॉल, आकर्षक झुंबर, मोजाइक, रंगीत फरशा, भित्तिचित्रे आणि विविध कलाकृती यामुळे या महालाला विशेष ऐतिहासिक आणि कलात्मक महत्त्व आहे.

1985 मध्ये उभारला

हा महाल रास अल खैमाहच्या राजघराण्यातील दिवंगत शेख अब्दुलअजीज बिन हुमैद अल कासिमी यांनी 1985 मध्ये बांधला. इराण, मोरोक्को, भारत आणि चीनमधील कारागिरांनी या वास्तूच्या सजावटीत योगदान दिल्याचे वृत्त आहे. महालामध्ये विविध देशांच्या वास्तुकलेचा प्रभाव दिसून येतो. फ्रान्स आणि बेल्जियममधील क्रिस्टल झुंबर, मोजाइक, रंगीत फरशा आणि भित्तिचित्रे यामुळे आतील भाग अत्यंत भव्य बनवण्यात आला होता.

मालक मात्र महालात राहिलेच नाहीत

या महालाची सर्वात मोठी गूढ बाब म्हणजे तो बांधल्यानंतर त्याचे मूळ मालक तेथे वास्तव्यास राहिलेच नाहीत. मानवी आणि प्राण्यांच्या आकृत्यांच्या शिल्पांबाबत कुटुंबातील आक्षेप हे त्यामागील कारणांपैकी एक असल्याचे वृत्त आहे. त्यानंतर महाल दीर्घकाळ रिकामा राहिला. महाल जवळपास तीन ते साडेतीन दशके वापराविना राहिल्याने त्याच्याभोवती अनेक प्रकारच्या रहस्यमय कथा पसरू लागल्या.

रात्री विचित्र आवाज ऐकू येत असल्याच्या अफवा

स्थानिक कथांनुसार, महालातून रात्री विचित्र आवाज, मुलांचे हसणे किंवा रडणे, अचानक दिवे लुकलुकणे आणि खिडक्मयांमधून अनोळखी चेहरे किंवा सावल्या दिसल्याच्या कथा सांगितल्या जातात. काही कथांमध्ये जिन्न किंवा अलौकिक शक्तींचाही उल्लेख केला जातो. मात्र या घटना सिद्ध झालेल्या नाहीत. या प्रामुख्याने स्थानिक लोककथा आणि अनेक वर्षांच्या अफवांवर आधारित आहेत. महाल दीर्घकाळ निर्जन राहिल्याने त्याची भुताचा महाल अशी प्रतिमा अधिक मजबूत झाली.

2019 मध्ये महालाला मिळाले नवे रूप

2019 मध्ये तारेक अहमद अल शरहान यांनी हा महाल अल कासिमी कुटुंबाच्या वारसांकडून विकत घेतला. त्यानंतर महालाचे मोठ्या प्रमाणावर नूतनीकरण करण्यात आले. त्याला अल कैसर अल घामेद म्हणजेच गूढतेचा महाल असे नाव देण्यात आले. नूतनीकरणानंतर हा महाल संग्रहालय आणि पर्यटनस्थळ म्हणून सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला. जुन्या फरशा, चित्रे, फर्निचर आणि शिल्पांची दुऊस्ती करण्यात आली.

आता पुन्हा विक्रीची चर्चा

आता या महालासाठी नव्या खरेदीदारांचा शोध सुरू आहे. रिअल इस्टेट एजन्सीच्या माहितीनुसार भारत, ब्रिटन आणि आखाती देशांतील गुंतवणूकदारांनीही या मालमत्तेबाबत रस दाखवला आहे. काही संभाव्य खरेदीदारांना या जागेचे पर्यटन आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील भविष्यातील उपयोग आकर्षित करत आहेत. महालाची विक्री फर्निचरशिवाय 2.25 कोटी दिरहम आणि मूळ फर्निचर, कलाकृती व संग्रहित वस्तूंसह 2.35 कोटी दिरहम अशा दोन पर्यायांत केली जात आहे.

हॉटेल, रिसॉर्ट किंवा खासगी महाल बनवण्याची संधी

नवीन मालकाला हा महाल खासगी निवासस्थान, पर्यटनस्थळ, हॉस्पिटॅलिटी प्रकल्प किंवा कार्यक्रमांसाठी वापरण्याची शक्मयता आहे. आवश्यक परवानग्या घेऊन त्याचे नूतनीकरण किंवा पुनर्विकासही करता येऊ शकतो. या मालमत्तेला सध्या वारसा-संरक्षणाशी संबंधित कठोर निर्बंध नसल्याचे विक्रीशी संबंधित वृत्तात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील मालकाला वास्तूमध्ये बदल करण्याचे मोठे स्वातंत्र्य मिळू शकते.

भुताचा महाल की ऐतिहासिक वास्तू?

अल कासिमी पॅलेसची खरी ओळख नेमकी भुताचा महाल म्हणून करायची की ऐतिहासिक आणि कलात्मक वास्तू म्हणून, हा चर्चेचा विषय आहे.

तब्बल 35 खोल्यांचा अल कासिमी पॅलेस 

 जवळपास 35 वर्षे ओसाड 

आता 60 कोटींहून अधिक रुपयांना विक्रीची तयारी

Advertisement
Tags :

.