For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

युएई, सिंगापूरला आता थेट ‘युपीआय’द्वारे पेमेंट सुविधा

06:46 AM Oct 31, 2026 IST | Tarun Bharat Portal
युएई  सिंगापूरला आता थेट ‘युपीआय’द्वारे पेमेंट सुविधा
Advertisement

बुर्ज खलिफा ते सेंटोसा पर्यंत बुकिंग करणे सुलभ

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

संयुक्त अरब अमिरात (युएई) आणि सिंगापूरला जाणारे भारतीय आता युपीआय अॅपद्वारे थेट कोणतीही सेवा बुक करू शकतील. तसेच कोणतेही ऑनलाइन पेमेंट करू शकणार आहेत. या दोन प्रमुख पर्यटनस्थळांना भेट देण्याची योजना आखणारे भारतीय प्रवासी आता चलन विनिमयाच्या त्रासाशिवाय सहजपणे बुकिंग आणि पेमेंट करू शकतील, असे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले. भारतीय पर्यटकांसाठी प्रवासाचे नियोजन सोपे करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.

Advertisement

नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची (एनपीसीआय) आंतरराष्ट्रीय शाखा असलेल्या एनपीसीआय इंटरनॅशनल पेमेंट्स लिमिटेडने युएई आणि सिंगापूरसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. ऑनलाइन बुकिंगसाठी युपीआयचा वापर सक्षम करण्यासाठी या घोषणा अनुक्रमे 29 जुलै 2026 आणि 9 सप्टेंबर 2026 रोजी करण्यात आल्या होत्या.

युएईमध्ये निओपे आणि इमार एंटरटेनमेंट यांच्या भागीदारीत ‘अॅट द टॉप, बुर्ज खलिफा’ येथे युपीआय व्यवहार स्वीकारले जातील. सिंगापूरमध्ये फोमो पे या अग्रगण्य पेमेंट संस्थेच्या मदतीने रिसॉर्ट्स वर्ल्ड सेंटोसापर्यंत यूपीआय स्वीकारण्याची सुविधा करण्यात आली आहे. सध्या सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती, फ्रान्स, मॉरिशस, नेपाळ, भूतान, कतार, श्रीलंका, कंबोडिया आणि ग्रीस येथे भारतीय प्रवाशांना परदेशात यूपीआयद्वारे पेमेंट करता येते. त्यानंतर आता उझबेकिस्तान 11वा देश म्हणून सामील होणार आहे.

Advertisement
Tags :

.