इंडोनेशियाविरुद्धच्या लढतींसाठी यू-23 फुटबॉल संघ जाहिर
वृत्तसंस्था/ बेंगळूर
भारतीय यू-23 फुटबॉल संघाचे प्रशिक्षक नौशाद मूसा यांनी इंडोनेशियाविरुद्ध होणाऱ्या मैत्रिपूर्ण लढतीसाठी 23 सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. भारताचा 23 वर्षांखालील संघ 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी जकार्ता येथे इंडोनेशियाच्या 23 वर्षांखालील संघाविरुद्ध दोन मैत्रीपूर्ण सामने खेळणार आहे. या संघाचे मुख्य प्रशिक्षक नौशाद मूसा यांनी फिफा आंतरराष्ट्रीय विंडो दरम्यान 10 आणि 13 ऑक्टोबर रोजी जकार्ता येथे इंडोनेशियाच्या 23 वर्षांखालील संघाविरुद्ध होणाऱ्या मैत्रीपूर्ण सामन्यांसाठी 23 सदस्यीय संघाची घोषणा केली. बेंगळूरमध्ये एका संक्षिप्त प्रशिक्षण शिबिरानंतर भारतीय संघ बुधवारी दुपारी इंडोनेशियाच्या राजधानीत दाखल झाला. दोन्ही सामने जकार्ता येथील गेलोरा बुंग कर्नो मद्या स्टेडियमवर खेळले जातील आणि भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता सुरू होतील.
भारतीय संघ-गोलकीपर : दिपेश चौहान, मोहनराज के, प्रियांश दुबे. बचावपटू : बिकाश यमनाम, दीपेंदू बिस्वास, हर्ष अरुण पलांडे, मोहम्मद साहीफ एपी, रिकी मीतेई हाओबम, रोशन सिंग थंगजम, सनातोंबा सिंग यांगलेम, सुमित शर्मा ब्रह्मचारीमायुम. मिडफिल्डर : आयुष देव छेत्री, बेकी ओरम, डॅनी मेतेई लैश्राम, लालरिन्लियाना हनम्ते, मोहम्मद आयमेन, विबिन मोहनन. फॉरवर्ड : मोहम्मद सुहेल, कोरो सिंग थिंगुजम, पार्थिब सुंदर गोगोई, श्रीकुट्टन एमएस, सुहेल अहमद भट, थोई सिंग हुइद्रोम.