महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

वायएसआर काँग्रेसच्या दोन खासदारांचा राजीनामा

07:00 AM Aug 30, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेदेपमध्ये सामील होण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था /अमरावती

Advertisement

वायएसआर काँग्रेसच्या दोन राज्यसभा खासदारांनी गुरुवारी राजीनामा दिला आहे. बीडा मस्थान राव यादव आणि वेंकटरमण  राव मोपीदेवी यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. उपराष्ट्रपती आणि राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. बीडा मस्थान राव यांचा कार्यकाळ जून 2028 मध्ये समाप्त होणार होता. राव हे तेलगू देसम पक्ष सोडून यापूर्वी वायएसआर काँग्रेसमध्ये सामील झाले होते. राव हे आता पुन्हा तेदेपमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. मोपीदेवी यांचा कार्यकाळ जून 2026 पर्यंत होता. ते देखील तेदेपमध्ये प्रवेश करणार असल्याचे मानले जात आहे. वायएसआर काँग्रेसच्या या दोन्ही खासदारांनी राजीनामा दिल्याने रालोआचे राज्यसभेतील बळ वाढणार आहे. रिक्त होणाऱ्या जागांवर तेदेप, जनसेना आणि भाजप या आघाडीचे सदस्य निवडून येणार असल्याने रालोआला लाभ होणार आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article