For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News : शाहूवाडीतील सैन्य भरतीस गेलेल्या दोन युवकांचा अपघातात मृत्यू

01:08 PM Nov 17, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur news   शाहूवाडीतील सैन्य भरतीस गेलेल्या दोन युवकांचा अपघातात मृत्यू
Advertisement

                       उसाच्या ट्रकची दुचाकीला धडक 

Advertisement

शाहूवाडी : कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर खुटाळवाडी गावानजीक कोल्हापूरच्या दिशेने बांबवडेकडे ऊस भरून जात असलेल्या ट्रकने पाठीमागून मोटरसायकलवरील दोन युवकांना धडक दिली. या अपघातात आंबर्डे (ता. शाहुवाडी) येथील सैन्य भरतीसाठी गेलेल्या दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पारस आनंदा परीट (वय १९), सुरज ज्ञानदेव उंड्रीकर (वय २०) अशी अपघातात मयत झालेल्या युवकांची नावे आहेत. या अपघाताची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे.

घटनास्थळ ब पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार आंबर्डे येथील पारस परीट व सुरज उंड्रीकर हे दोन युवक कोल्हापूर येथे सैन्य भरतीसाठी शनिवार १५ नोव्हेंबर रोजी गेले होते. रविवार १६ नोव्हेंबर रोजी ते सायंकाळच्या दरम्यान आपल्या आंबर्डे गावी परत येत होते. यावेळी बांबवडे नजीक खुटाळवाडी गावच्या हद्दीत कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडेच्या दिशेने ऊस भरलेला ट्रक येत होता. या ट्रकची मोटरसायकलवर असलेल्या सुरज उंड्रीकर या दोन्ही युवकांना पाठीमागून जोराची धडक बसली.

Advertisement

या धडकेत दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी जोराची होती दोन्ही युवकांच्या डोक्याला अतिशय गंभीर दुखापत झाली. डोक्याचा चेंदामेंदा झालेली स्थिती घटनास्थळी दिसत होती. अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता. अपघातानंतर ट्रक चालक पळून जात असता नागरिकांनी त्याला पकडले. अपघाताची माहिती मिळताच हायवे पोलीस व शाहूवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. अपघातातील दोन्ही युवकांचे मृतदेह मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदन करण्यासाठी दाखल करण्यात आले.

Advertisement
Tags :

.