For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मुंगूल-मडगाव अपघातात झारखंडचे दोघे युवक ठार

12:14 PM Apr 16, 2024 IST | Tarun Bharat Portal
मुंगूल मडगाव अपघातात झारखंडचे दोघे युवक ठार
Advertisement

मडगाव : फातोर्डा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील मडगाव-कोलवा रस्त्यावरील मुंगूल येथे झालेल्या एका स्वयं अपघातात नोकरीसाठी गोव्यात आलेल्या झारखंडच्या दोन युवकाना प्राणास मुकावे लागले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. दालू कुजाल (वय 18) आणि जीवन सोरेन (वय 21) दोघेही रा. झारखंड अशी मयतांचे नावे आहेत. मयत दोघेही एका मोटरसायकलवरुन मडगावहून कोलव्याच्या दिशेने जात होते. मुंगूलजवळ चालकाचा दुचाकीवरील ताबा गेल्याने दुचाकी रस्त्याच्या बाजूला धडकली.  फातोर्डा पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच हवालदार विल्टन रिबेलो व इतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले असता दोघे युवक गंभीररित्या जखमी होऊन पडले होते. त्यांना मडगावच्या जिल्हा इस्पितळात नेण्यात आले तेव्हा दोघानांही मृतावस्थेत आणले अशी नोंद करण्यात आली.  फातोर्डा पोलिसांनी मयतांच्या घरच्यांना कळविले आहे. पैकी एका युवकाची घरची मंडळी फातोर्डा पोलीस स्थानकात सोमवारी सकाळी दाखल झाली होती. दुसऱ्या मयत युवकाच्या घरची मंडळी आज मंगळवारी गोव्यात येणार आहेत.    अंत्यसंस्कारासाठी दोन्ही मृतदेह झारखंडात नेण्यात येणार आहेत. दोघेही कोळंब-रिवण येथील एका खासगी आस्थापनात काम करीत होते अशी माहिती पोलीस सूत्रानी माहिती दिली.

Advertisement

शिर्ली अपघातातील जखमीचा मृत्यू

गेल्या काही दिवसापूर्वी शिर्लीजवळ एका कारची धडक बसल्याने गंभीर जखमी झालेले कपेलवाडो-मांडप, नावेली येथील रॉक पैरैरा (वय 55) यांचा मृत्यू झाला. रॉक पेरैरा कारच्या धडकेत गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना बांबोळी येथील सरकारी इस्पितळात दाखल करण्यात आले होते. उपचार चालू असताना सोमवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला. या अपघातासंबंधी हवालदार रणजीत देसाई यांनी प्राथमिक पोलीस सोपस्कार पूर्ण केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.