केपे कालव्यात बुडून दोन युवकांना मृत्यू
02:52 PM Apr 20, 2026 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
केपे : बोपरीमड्डी-केपे येथील कालव्यात आंघोळीकरिता उतरलेल्या दोन युवकांना मृत्यू येण्याची घटना घडली असून केपे पोलिसांनी कुडचडे अग्निशामक दलाच्या मदतीने दोन्ही मृतदेह बाहेर काढले. पंचनामा करून हे मृतदेह शवचिकित्सेकरिता पाठविण्यात आले आहेत. केपे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत युवक इग्नेशियस फर्नांडिस (24, फातोर्डा) व हरजित (उत्तराखंड) हे दोघे माजोर्डा येथे कामाला होते. सदर युवक आंघोळीसाठी कालव्यात उतरल्यावेळी त्यांना बुडून मृत्यू आल्याचा अंदाज आहे. कारण कालव्यानजीकच्या रस्त्याच्या बाजूला दुचाकी व कपडे ठेवलेले होते. पुढील तपास केपे पोलिस करत आहेत.
Advertisement
Advertisement