गांजा विक्रीसाठी आलेले दोन तरुण जाळ्यात
बेळगाव ग्रामीण पोलिसांची हुंचेनहट्टीत कारवाई
बेळगाव : गांजा विक्रीसाठी मोटारसायकलवरून आलेल्या दोन तरुणांना अटक करून त्यांच्याजवळून 1 किलो 16 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी हुंचेनहट्टी-जयनगर पाण्याच्या टाकीजवळ बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. केए 22 एचजे 8895 क्रमांकाच्या मोटारसायकलवरून गांजा विक्रीसाठी दोन तरुण आल्याची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक लक्काप्पा जोडट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून दोन तरुणांना ताब्यात घेतले व त्यांच्याजवळून मोटारसायकल व गांजासाठा जप्त करण्यात आला. राहुल बसवराज सुतार (वय 23) राहणार जयनगर-मच्छे, परशुराम कल्लाप्पा बुगडीकट्टी (वय 24) राहणार हुंचेनहट्टी अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर अमलीपदार्थ प्रतिबंधक कायदा 20(बी) अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. गांजा सेवन करणाऱ्यांबरोबरच गांजाची विक्री करणाऱ्यांविरुद्धही पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे.