For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन युवतींवर जडले प्रेम

06:05 AM Mar 30, 2025 IST | Tarun Bharat Portal
दोन युवतींवर जडले  प्रेम
Advertisement

विवाह हे दोन जीवांचे जन्मजन्मांतरीचे मीलन असते, अशी समजूत आहे. विवाहात वधू आणि वर एकमेकांना जन्मभरच नव्हे, तर अनेक जन्म आपले सहजीवन राहील असे वचन देतात. सर्वसाधारणपणे विवाह एक पुरुष आणि एक स्त्री यांचाच असतो. एक स्त्री एकच पुरुषावर किंवा एक पुरुष एकाच स्त्रीवर प्रेम करु शकतो, ही सर्वसाधारण धारणे असते. तथापि, एका व्यक्तीचा दोन युवतींवर एकाचवेळी जीव जडला, तर काय होईल, याचे उत्तर शोधण्sा सोपे काम नाही.

Advertisement

तेलंगणा राज्यातील गुमनूर या गावी वास्तव्यास असणाऱ्या सूर्यदेव नामक पुरुषाचे दोन युवतींवर एकाचवेळी प्रेम बसले. इतके, की त्याने दोन्ही युवतींशी एकाच वेळी विवाह करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक भारतात हिंदूंसाठी द्विभार्या प्रतिबंधक कायदा आहे. एक पुरुषाला दोन महिलांशी विवाह करता येत नाही. तरीही सूर्यदेव याने हा धोका पत्करला आहे. या दोन युवतीही त्याच्या प्रेमात पडल्या आहेत. त्यांनी एकत्र जीवन व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रारंभी नातेवाईक आणि गावकऱ्यांनी विरोध केला. पण पुढे तो मावळल्याचे दिसत आहे.

सूर्यदेव यांची लग्नपत्रिकाही पंचक्रोशीत चर्चेचा विषय ठरली आहे. हिंदूंच्या लग्नपत्रिकेवर सर्वसाधारणपणे एक वर आणि एक वधू यांची नावे असतात. पण सूर्यदेव यांच्या पत्रिकेत एक वर आणि दोन वधू यांची नावे आहेत. त्यामुळे अनेकांचा या पत्रिकेवर विश्वासही बसला नाही. तथापि, हा विवाह अत्यंत थाटामाटात पार पडला. ढोल ताशांच्या गजरात वरातही निघाली. असा विवाह बेकायदेशीर असतो हे माहीत असूनही प्रेमापोटी तो करण्यात आला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.