For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भटकळ तालुक्यातील वेंकटपूर येथे झालेल्या कार अपघातात दोन युवक ठार

11:06 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
भटकळ तालुक्यातील वेंकटपूर येथे झालेल्या कार अपघातात दोन युवक ठार
Advertisement

कारवार : भटकळ तालुक्यातील राष्ट्रीय हमरस्ता क्र. 66 वरील 5 वेंकटपूर येथे झालेल्या कार अपघातात दोन युवक ठार झाल्याची दुर्घटना शनिवारी मध्यरात्री घडली. यापैकी एका युवकाचा मृत्यू अपघातस्थळीच झाला. तर अन्य एका युवकाचा मृत्यू रुग्णालयाला नेत असताना झाला. अपघातात मृत्यू झालेल्या युवकांची नावे बिलाल मोहम्मद आश्रफ रूकमुद्दीन शिपाई (वय 15) आणि अयान (वय 20, रा. आझादनगर, भटकळ) अशी आहेत. बिलाल याचा मृत्यू अपघातस्थळीच झाला. तर अयान याचा मृत्यू उपचारासाठी नेत असताना झाल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी, अयान आणि बिलाल हे तरूळा शनिवारी मध्यरात्री कारमधून भटकळ तालुक्यातील शिराली येथून भटकळकडे निघाले होते. अयान हा कार चालवीत होता. वेंकटापूर येथील राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक 66 अयानचे कारवरील नियंत्रण चुकले आणि कारने रस्त्याबाजूला असलेल्या विद्युत खांबाला जोराची धडक दिली. त्यामुळे बिलाल हा घटनास्थळीच ठार झाला. गंभीररीत्या जखमी झालेल्या अयानला उपचारासाठी उडूपीला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. विद्युत खांबाला जोराची धडक दिल्याने कारची मोठी हानी झाली आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही. अपघातस्थळाच्या परिसरात बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवर अपघाताचे कारण समजू शकते.

Advertisement
Advertisement
Tags :

.