For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दागिने चोरल्याच्या आरोपावरून वड्डरवाडीच्या दोन महिलांना अटक

12:26 PM Feb 05, 2026 IST | Tarun Bharat Portal
दागिने चोरल्याच्या आरोपावरून वड्डरवाडीच्या दोन महिलांना अटक
Advertisement

दीड वर्षापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकावर केली होती चोरी

Advertisement

बेळगाव : दीड वर्षापूर्वी मध्यवर्ती बसस्थानकावर प्रवाशांच्या अंगावरील दागिने चोरल्याच्या आरोपावरून मार्केट पोलिसांनी वड्डरवाडी (गँगवाडी) येथील दोन महिलांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून 11 लाख 25 हजार रुपये किमतीचे 76 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मार्केटचे एसीपी संतोष सत्यनायक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. एम. शिंदे, शिवाप्पा मडीवाळ, यमनाप्पा कांबळे, एल. एस. कडोलकर, नवीनकुमार ए. बी., विश्वनाथ माळगी, आसीर अहमद जमादार, शंकर कुबटोळ्ळी, सुरेश कांबळे, कार्तिक जी. एम., एम. बी. वडेयर, मल्लिकार्जुन गुदगोप्प, प्रतिभा गिड्डण्णावर, निताली कोळी, मोदिना जमालसाबनावर, सावित्री गोडी, तांत्रिक विभागाचे रमेश अक्की व महादेव काशिद आदींनी ही कारवाई केली आहे.

आरती ऊर्फ फरिदा शिवा चौगुले (वय 26), सरस्वती संतोष रोकडे (वय 45) दोघीही राहणार वड्डरवाडी (गँगवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तिसरा आरोपी शिवा राम चौगुले हा फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 2024 मध्ये मध्यवर्ती बसस्थानक परिसरात चार वेळा चोरी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. चोरीचे दागिने आटवून रामलिंगखिंड गल्ली येथील एका फायनान्स कंपनीत सोने ठेवून पैसे उचलण्यात आले होते. शिवा चौगुलेच्या नावाने हे दागिने ठेवले जात होते. पोलिसांनी 76 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. शिवाचाही शोध घेण्यात येत आहे. पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, उपायुक्त नारायण बरमनी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.