For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींना आग

10:58 AM Sep 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या दुचाकींना आग
Advertisement

बेळगाव : घरासमोर उभ्या करण्यात आलेल्या दोन दुचाकींनी पेट घेतल्याची घटना संतिबस्तवाड येथे घडली असून या आग दुर्घटनेत दोन लाख रुपयाहून अधिक नुकसान झाले आहे. यासंबंधी कल्लाप्पा बिर्जे यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. घरासमोर नवीन होंडा शाईन उभी करण्यात आली होती. त्याच्या शेजारी आणखी एक जुनी होंडा शाईन होती. शॉर्टसर्किटने या दोन्ही वाहनांना आग लागल्याचे कल्लाप्पा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.