कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खडेबाजार पोलिसांकडून दुचाकी चोरट्याला अटक

08:32 AM Jan 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बेळगाव : मोटारसायकल चोरट्याला अटक करून त्याच्याकडून 1 लाख 45 हजार रुपये किमतीच्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मंगळवार दि. 28 रोजी खडेबाजार पोलिसांनी ही कारवाई केली असून रमेश चंद्रकांत अरळीकट्टी (वय 33) असे त्याचे नाव असून न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली. वरील संशयिताला पोलिसांनी संशयास्पदरित्या ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने नाथ पै सर्कल येथून एका स्कूटरची चोरी केल्याची कबुली दिली. त्याचबरोबर खडेबाजार आणि शहापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रत्येकी एक मोटारसायकल त्याने चोरली होती. पोलिसांनी चोरीच्या दोन्ही मोटारसायकली जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 1 लाख 45 हजार रुपये इतकी आहे. सदर कारवाई खडेबाजारचे पोलीस निरीक्षक श्रीशैल गाभी, पोलीस उपनिरीक्षक आर. बी. सौदागर, आनंद आदगोंड, ए. बी. शेट्टी यांच्यासह सहकाऱ्यांनी केली आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article