Sangli News | कुपवाड-तानंग मार्गावर दुचाकी-टेम्पो अपघात; युवक गंभीर जखमी
टेम्पोने भरधाव वेग घेतल्याने दुचाकीखाली आदळले
कुपवाड -तानंगहून मिरजला जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मालवाहू टेम्पोला मागून येणाऱ्या दुचाकीची जोराने धडक बसली. टेम्पोने अचानक बळन घेतल्याने हा अपघात घडला. यावेळी समोरून भरधाव वेगाने येष्ाया आयशर टेम्पोखाली दुचाकी सापडली. यावेळी टेम्पो चालकाने दुचाकी चालकास फरफटत नेल्याने चालक राजेश शिवलिंग पाटील (वय ३५, रा. महादेव मंदिरामागे, बेडग ता. मिरज) हा गंभीर जखमी झाला. या घटनेची कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कुपवाड पोलिसांनी आयशर टेम्पो चालक भारत लक्ष्मण माने (वय ३९, रा.बेडग ता. मिरज) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, राजेश शिवलिंग पाटील हे शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून (एम. एच.१०, सी ई ८१०४) तानंग मार्गे बेडग गावी जात होते.
तासगाव फाट्याजवळील रस्त्यावर छोटा टेम्पो (एम. एच. ११ सी एच ३५५२) चालकाने अचानक वळण घेतल्याने राजेश पाटील यांनी छोटा टेम्पोच्या पाठीमागील बाजूस धडक दिली. पाटील हे समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर टेम्पो (एम. एच. ०९, जी एच १५६६) खाली सापडल्याने टेम्पो चालकाने राजेश पाटील यांना फरफटत नेले. या अपघातात पाटील गंभीर जखमी झाले. कुपवाड पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. आयशर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल आहे.