अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
तासगाव :
पाचवामैल ते वसगडे रोडवर नागांव गावचे हद्दीत दुचाकीस अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी होऊन मयत झाले आहेत. याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन चालका विरूध्द तासगांव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातात प्रकाश बापू पाटील (६७ रा. ढवळी ता. तासगांव) हे मयत झाले आहेत. याप्रकरणी त्यांचा मुलगा अमोल प्रकाश पाटील यांनी अज्ञात वाहनचालका विरूध्द फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी १४ मार्च रोजी मयत प्रकाश पाटील हे आपल्या स्पॅलेंडर दुचाकी (क्रमांक एम एच-१०-डीएफ-७८५७) वरून ढवळी ते वसगडे जात होते.
शुक्रवारी सकाळी प्रकाश पाटील हे दुचाकी वरून नागाव गावचे हद्दीत रोडवर आले असता पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनावरील अज्ञात चालकाने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांच्या डोकीस व उजवे हातास मार लागून ते गंभीर जखमी झाले. या अपघातात प्रकाश पाटील हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.