For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Sangli News : जत-शेगाव मार्गावर दुचाकीचा ट्रॅक्टरला धडक; एकाचा मृत्यू

03:47 PM Dec 29, 2025 IST | NEETA POTDAR
sangli news   जत शेगाव मार्गावर दुचाकीचा ट्रॅक्टरला धडक  एकाचा मृत्यू
Advertisement

                                          जत-शेगाव मार्गावर दुचाकी अपघात

Advertisement

जत : जत-शेगाव अचकन फाट्याजवळ दुचाकीने रस्त्यावर हळळी ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. अक्षय ज्ञानदेव निकम (वय २५, रा. शेगाव, ता. जत) असे मृत तरुणाचे नाव असून शनिवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे.

यामध्ये विशाल सपताळ (रा. अंतराळ, ता. जत) याला सांगली येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले आहे. आदित्य कोडग (बय २३, मूळ रा. आवंढी, सद्या मुंबई) याच्यावर जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Advertisement

पोलिसांकडून व घटनास्थळीमिळालेली अधिक माहिती अशी की, मयत अक्षय निकम हा खिडक्याचे स्लायडींग बनविण्याचे काम करतो. गेल्या दोन ते तीन महिन्यापूर्वी त्याने जत येथे आपले दुकान चालू केले होते. विशाल सपताळ हा त्याच्या दुकानात काम करत होता. अक्षय याचा मावस भाऊ आदित्य कोडग नाताळच्या सुट्ट्या असल्याने दोन दिवसांपूर्वी आवंढी गावी आला होता.

दरम्यान, हे तिघेही दुकान बंद करून दुचाकीवरून गावाकडे निघाले होते. जत पासून शेगावकडे जाण्प्रया रोडवर अर्ध्या किलोमीटर अंतरावर ट्रॅक्टर अचकनहळळी कडे वळण घेत असताना दुचाकीवरून आलेल्या तिघांनी ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. यात अक्षय याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

Advertisement
Tags :

.