For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ट्रकला दुचाकीची धडक, युवकाचा जागीच मृत्यू

01:18 PM Jun 24, 2026 IST | Tarun Bharat Portal
ट्रकला दुचाकीची धडक  युवकाचा जागीच मृत्यू
Advertisement

कोलवाळ-चिखली येथील घटना

Advertisement

म्हापसा : कोलवाळ चिखली येथे सोमवारी उशिरा रात्री रस्त्याच्या कडेला बंद पडून उभ्या असलेल्या मालवाहू ट्रकला दुचाकीने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने या अपघातात रविश यदुनंद तारी (रा. सांत इस्तेव, तिसवाडी) वय 20 वर्षे, याचा जागीच मृत्यू झाला. मागे बसलेला त्याचा मित्र लक्ष्मण भोसले (वय 18, हळदोणा) हा गंभीर जखमी झाला आहे. रविश तारी आणि लक्ष्मण भोसले हे दोघे मित्र कामुर्ला येथे आपल्या मामाच्या घरी गेले होते. तेथून परतत असताना रात्री सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास कोलवाळ औद्योगिक वसाहतीतील ग्लेनमार्क कंपनीजवळ त्यांच्या ‘फसिनो’ दुचाकीची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. धडक इतकी जबरदस्त होती की दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने रुग्णवाहिकेतून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर रविश तारी याला मृत घोषित केले. गंभीर असलेल्या लक्ष्मण भोसले याला पुढील उपचारासाठी बांबोळी येथे पाठविण्यात आले.

Advertisement
Advertisement
Tags :

.