दोन दुचाकीत अपघात ; दोघे गंभीर
04:36 PM Jan 01, 2025 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement
सावंतवाडी -
Advertisement
शहरातील सालईवाडा शिरोडा_ नाका जवळ दोन दुचाकी मध्ये झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले असून त्यातील दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडला. बुलेटस्वार ओमकार विजय पांढरे ( 24) रा निरवडे आणि टीव्हीएस दुचाकीस्वार, बाबुराव नाईक, रा कोलगाव हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी बांबुळी गोवा येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
Advertisement
Advertisement