For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मिथुनच्या दोन वेबसीरिजची घोषणा

06:58 AM Feb 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
मिथुनच्या दोन वेबसीरिजची घोषणा
Advertisement

मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचा पुत्र नमाशीने एक रोमँटिक कॉमेडी आणि अन्य एंथोलॉजी सीरिजची घोषणा केली आहे. याचबरोबर त्यांनी सीरिजमधील अन्य कलाकारांची माहिती दिली आहे. मिथुन चक्रवर्ती आणि त्यांचा पुत्र नमाशीने स्वत:चा बॅनर एमवायआरएनडी मूव्हीज अंतर्गत दोन वेबसीरिजची घोषण केली आहे. पहिल्या सीरिजचे नाव ‘मेस-टरपीस’ असून ही एक रोमँटिक-कॉमेडी धाटणीची आहे. या सीरिजमध्ये नमाशीसोबत रेशम शाहनी मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. या सीरिजचे पोस्टरही शेअर करण्यात आले आहे. याचे दिग्दर्शन नमाशी आणि श्रीकांत वाट्स मिळून करत आहेत. स्टोरीज ऑफ फियर ही एक एंथोलॉजी सीरिज असून ती 10 एपिसोड्समध्ये असेल. ही भीती आणि फोबियाच्या थीमव आधारित असेल. याचे दिग्दर्शन सचिन करांडे करत आहे. याचे लेखन श्वेता बोथरा आणि स्वप्निल राजे यांनी केले आहे. या सीरिजचे चित्रिकरण जुलै महिन्यात सुरू होणार आहे.  नमाशी हा मिथुन चक्रवर्ती आणि योगिता बाली यांचा पुत्र आहे. नमाशीने बॅड बॉय या चित्रपटाद्वारे 2023 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.  यानंतर तो द बंगाल फाइल्स चित्रपटातही दिसून आला होता.

Advertisement

Advertisement
Tags :

.