For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इंडोनेशियात दोन रेल्वेंची टक्कर, 14 जणांचा मृत्यू

06:14 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
इंडोनेशियात दोन रेल्वेंची टक्कर  14 जणांचा मृत्यू
Advertisement

दुर्घटनेत 80 हून अधिक जण जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ जकार्ता

इंडोनेशियाची राजधानी जकार्तानजीक बेकासी रेल्वेस्थानकावर सोमवारी रात्री उशिरा दोन रेल्वेगाड्यांची टक्कर झाली असून या दुर्घटनेत 14 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 84 जण जखमी झाले आहेत. अनेक प्रवासी रेल्वेडब्यांमध्ये अडकून पडल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी मंगळवारी सकाळपर्यंत मदत अन् बचावकार्य सुरू राहिले.

Advertisement

दुर्घटनेतील जखमींना नजीकच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दुर्घटनाग्रस्त दुसऱ्या रेल्वेगाडीतील सर्व 240 प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ही दुर्घटना बेकासी स्थानकावर कम्यूटर लाइन ट्रेन आणि दीर्घ पल्ल्याच्या अर्गो ब्रोमो अंगग्रेक रेल्वेदरम्यान झाली आहे. ही रेल्वे जकार्ता आणि सुरबायादरम्यान धावणारी प्रमुख रेल्वेसेवा मानली जाते. एका लेव्हल क्रॉसिंगवर अडथळा आल्याने कम्यूटर रेल्वे थांबली होती आणि मागून येणारी दीर्घ पल्ल्याची रेल्वेशी तिची टक्कर झाल्याचे प्रारंभिक तपासात समोर आले आहे.

Advertisement
Tags :

.