महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दोघे पर्यटक बुडाले

12:13 PM Nov 17, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकटा पुण्याचा, तर दुसरा बेंगळुरु येथील

Advertisement

पेडणे : मोरजी समुद्रकिनाऱ्यावर दोघा देशी पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना काल गुरुवारी 16 रोजी सकाळी घडली. पुणे येथील फैयाज अहमद (वय 47 वर्ष) आणि बेंगळुरु येथील राजेश शर्मा (वय  50  वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. पेडणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील फैयाज अहमद (वय 47 वर्ष) हा आपल्या कुटुंबियांसोबत मोरजी येथे हॉटेलमध्ये उतरला होता. काल सकाळी समुद्रात अंघोळीसाठी गेला असता त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला. दृष्टीच्या जीवरक्षकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. त्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर तुये येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेले असता, तिथे डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. फैयाज अहमद आपल्या बायको आणि दोन मुलांसोबत तीन दिवसांपूर्वी गोव्यात आला होता.

Advertisement

 बेंगळुरुचा राजेश शर्मा 

याच दरम्यान मोरजी समुद्रकिनाऱ्यावर घडलेल्या दुसऱ्या घटनेत बेंगलोर येथील राजेश शर्मा (वय  50  वर्षे)  हा समुद्रात पोहण्यासाठी उतरला असता बुडाला. त्यालाही दृष्टीच्या जीवरक्षकाने पाण्याबाहेर काढले. मात्र तुये येथील आरोग्य केंद्रात नेले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. दोघांचेही मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी पेडणे पोलिसांनी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात बांबोळी येथे पाठविले. पुणे येथील फैयाज अहमद याचा मृतदेह सायंकाळी शवचिकित्सेनंतर त्याच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात आला, अशी माहिती पेडणे पोलीस निरीक्षक सचिन लोकरे यांनी दिली.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article