For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पेरूमध्ये दोन पर्यटक रेल्वेंची टक्कर, एकाचा मृत्यू

06:28 AM Jan 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
पेरूमध्ये दोन पर्यटक रेल्वेंची टक्कर  एकाचा मृत्यू
Advertisement

वृत्तसंस्था/ फरीदाबाद

Advertisement

हरियाणाच्या फरीदाबाद येथे एका धक्कादायक घटना घडली आहे. आईवर नाराज होत घराबाहेर पडलेल्या एका 28 वर्षीय युवतीला लिफ्ट देत कारमधील दोन युवकांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आहे. दोन तासांपेक्षा अधिक काळापर्यंत आरोपींनी युवतीला फरीदाबाद-गुरुग्राम रस्त्यावर कारने फिरविले. तर बलात्कारानंतर रात्री उशिरा जवळपास 3 वाजता युवतीला एका हॉटेलनजीक फेकून आरोपी फरार झाले. युवतीला एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे.

सायबर सेलच्या मदतीने तांत्रिक तपासाच्या आधारावर दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रारंभिक चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. तर गुन्ह्यात वापरण्यात आलेली ईको कार जप्त करण्यात आली आहे. तर पीडितेचा जबाब नोंदवून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :

.