महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

महाराष्ट्राकडून कृष्णेत दोन टीएमसी पाणी

11:27 AM Apr 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पालकमंत्री जारकीहोळी यांच्या प्रयत्नांना यश : हिडकल जलाशयातूनही नदीत सोडले पाणी

Advertisement

बेळगाव : महाराष्ट्रातून कृष्णा नदीला दोन टीएमसी तसेच हिडकल जलाशयातून तीन नाल्यांना कृष्णा नदीमध्ये एक टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची सोय करुन देण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिली. यमकनमर्डी येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. जिल्ह्यामध्ये दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असल्याने याबरोबरच पावसाची कमतरता असल्यामुळे पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी सरकारकडून महाराष्ट्राकडे पाण्यासाठी मागणी करण्यात आली होती. त्यानुसार महाराष्ट्र सरकारकडून कृष्णा नदीमध्ये दोन टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. तसेच हिडकल जलाशयातून तीन नाल्यांच्या माध्यमातून कृष्णा नदीमध्ये एक टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. या प्रयत्नांना यश आले आहे. पाणी सोडण्याची ही प्रक्रिया वर्षामध्ये एकदा कायम असणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि नागरिकांना पाण्याची सोय झाली आहे. पाणी वाया जाऊ नये या दृष्टीने पाण्याचा लाभ करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Advertisement

शेतकऱ्यांकडून मंत्री जारकीहोळींचे आभार

दुष्काळी परिस्थितीमुळे पिण्याच्या पाण्यासह शेतवडीला पाण्याची समस्या निर्माण झाली होती. यामुळे शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या संगोपनाचा प्रश्न उभा ठाकला होता. यावरुन शेतकऱ्यांनी मंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन पाण्याची समस्या मांडली होती. याची दखल घेत पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांतून मंत्री सतीश जारकीहोळी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article