खानापूरच्या दोघा चोरट्यांना कोल्हापुरात अटक
रोकड, दागिन्यांसह 86 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या पोलीस रेकॉर्डवरील दोघा आंतरराज्य चोरट्यांना पोलिसांनी अटक केली. विक्रम ऊर्फ राजू बाळू कित्तूरकर, महादेव नारायण धामणीकर (दोघे रा. इंदिरानगर, हालशी, ता. खानापूर, जि. बेळगाव) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून 13 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून 26 हजार ऊपये रोकड, 1 किलो 200 ग्रॅम सोने, 1 किलो 430 ग्रॅम चांदी, दोन दुचाकी, मोबाईल आणि अन्य साहित्य असा 86 लाख 26 हजार 100 ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी केली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी मंगळवारी पत्रकार बैठकीत दिली. पंडित म्हणाले, गेल्या काही महिन्यांपासून जिह्यात घरफोडीच्या गुह्यात वाढ झाली होती. याची गांभीर्याने दखल घेऊन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या दृष्टीने विशेष मोहीम राबविण्याबाबत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेगवेगळी पथके कऊन घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
याचदरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना जिह्यातील (कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्य) सीमावर्ती भागातील गावांमध्ये विशेषत: रस्त्याकडेला असलेल्या बंद घरांना टार्गेट कऊन, ती घरे फोडून चोऱ्या केल्याचे निदर्शनास आले. त्यावऊन पोलिसांनी जिह्यात दिवसा घडलेल्या घरफोडीच्या गुह्यांचा एकत्रितरित्या तपास सुऊ केला. तपासादरम्यान पोलिसांनी कोडोली (ता. पन्हाळा) येथे भरदिवसा झालेली घरफोडी पोलीस रेकॉर्डवरील आंतरराज्य गुन्हेगार विक्रम कित्तूरकर याने आणि त्याच्या साथीदाराने मिळून केल्याची माहिती समजली. तसेच कित्तूरकर हा चोरीच्या गुह्यातील सोन्याच्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी मुरगूड नाका ते सिध्दनेर्ली रस्त्यावरील एका मंगल कार्यालयानजीक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यावऊन या ठिकाणी पोलिसांनी सापळा लावला. या ठिकाणी तो एका दुचाकीवऊन आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी तो वापरत असलेली चोरीची दुचाकी आणि सोन्या-चांदीचे दागिने असा 88 हजार ऊपये किंमतीचा मुद्देमाल जप्त कऊन त्याला अटक केली.
पोलिसांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने विक्रीसाठी आणलेले चोरीचे दागिने हे मुरगूड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या घरफोडीतील तर दुचाकी खंडाळा (जि, सातारा) येथून चोरल्याची कबुली दिली. तसेच घरफोडी करण्यामध्ये महादेव धामणीकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार साथीदार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर आम्ही दोघांनी मिळून गेल्या आठ महिन्यांपासून जिह्यातील चंदगड, कोडोली, मुरगूड, गडहिंग्लज, भुदरगड, आजरा, राधानगरी आणि इस्लामपूर (जि. सांगली) या 13 ठिकाणी भरदिवसा बंद घरे फोडून चोऱ्या केल्याची माहिती दिली. याचदरम्यान महादेव धामणीकर याला बेळगाव पोलिसांनी चोरीच्या गुह्यात अटक केली. त्यानंतर त्याचा न्यायालयाच्या आदेशाने ताबा घेतला. दोघांनी घरफोडीमधील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड वाटून घेतल्याचे सांगितले. सोन्याचे दागिने खानापूर (जि. बेळगाव) येथील फेडरल बँकेच्या शाखेत आणि मुथूट फिनकॉर्प शाखेत तारण ठेवून त्यावर हजारो ऊपयांचे कर्ज घेऊन ते पैसे गोव्यामध्ये चैनीसाठी खर्च केल्याचे सांगितले. त्यावऊन पोलिसांनी खानापूर येथील फेडरल बँकेच्या शाखेतून आणि मुथूट फिनकॉर्प शाखेतून 694 ग्रॅम सोन्याचे आणि 450 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले. अन्य सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड दोघांच्या घरातून जप्त केले. तसेच चोरीच्या दोन दुचाकी देखील जप्त केल्या.
कारवाईत यांचा सहभाग
भरदिवसा घरफोड्या करणाऱ्या दोघा आंतरराज्य गुन्हेगारांना अटक करण्यामध्ये कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे, तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक संदीप जाधव, जालिंदर जाधव, शेष मोरे, पोलीस अंमलदार हिंदुराव केसरे, सुरेश पाटील, समीर कांबळे, दीपक घोरपडे, संजय पडवळ, प्रशांत कांबळे, राजेश राठोड, संजय कुंभार, अशोक पवार, प्रवीण पाटील, सागर माने, राजू कांबळे, प्रकाश पाटील, सोमराज पाटील, अमित सर्जे, सुशिल पाटील, बालाजी पाटील, महेश आंबी, संजय देसाई, कृष्णात पिंगळे, तुकाराम राजीगरे, महेश गवळी, हंबीरराव अतिग्रे, यशवंत कुंभार, राजेंद्र वरंडेकर, राजू येडगे यांचा सहभाग होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.
मुथुटमधील 200 ग्रॅम सोन्याची जप्तीची प्रक्रिया सुऊ
विक्रम कित्तूरकर, महादेव धामणीकर या दोघांनी चोरीचे सोन्याचे दागिने खानापूर येथील फेडरल बँकेच्या शाखेबरोबर मुथुट फिनकॉर्प शाखेत तारण ठेवून पैसे उचलले आहेत. पोलिसांना फेडरल बँकेतील सर्व सोने जप्त करण्यात यश आले. तर मुथूट फिनकॉर्पमधील काही सोने जप्त केले. अजून 200 ग्रॅम सोने जप्त करण्याचे बाकी आहे. मुथुट फिनकॉर्पने न्यायालयात धाव घेतल्यामुळे 200 ग्रॅम सोने जप्तीची प्रक्रिया सुऊ असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.