For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दोन दहशतवाद्यांचा बारामुल्लात खात्मा

06:47 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
दोन दहशतवाद्यांचा बारामुल्लात खात्मा
Advertisement

काश्मीरमधील चकमकीत  दोन सुरक्षा कर्मचारी जखमी; दिवसभर शोधमोहीम

Advertisement

वृत्तसंस्था/ श्रीनगर

जम्मू काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात बुधवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये जोरदार चकमक झाली. हदीपोरा भागात झालेल्या या संघर्षात दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तसेच विशेष ऑपरेशन ग्रुपचा एक शिपाई आणि एक पोलीस जखमी झाला आहे. हदीपोरामध्ये पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरू केली होती. सुरक्षा दल दहशतवाद्यांच्या लपण्याच्या संशयित ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार सुरू केल्यानंतर चकमक सुरू झाली.

Advertisement

यापूर्वी सोमवारी सकाळी सुरक्षा दलांनी बांदीपोरामध्ये दहशतवादी एलईटी कमांडर उमर अकबर लोन उर्फ जाफरला कंठस्नान घातले होते. तो पट्टणचा रहिवासी होता. या परिसरात 2 ते 3 दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळताच त्यांच्या शोधासाठी लष्कराचे विशेष मोहीम सुरू केली होती. शोधकार्य तीव्र केले असता दहशतवाद्यांनी गोळीबार केला. ड्रोन फुटेजमध्ये ठार झालेल्या दहशतवादी जाफरचा मृतदेह जंगलात पडलेला दिसून आला होता.

रियासी हल्ल्याचा तपास एनआयएकडे

रियासी येथे 9 जून रोजी भाविकांच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला आहे. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर या प्रकरणी नवीन एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 16 जून रोजीच गृहमंत्र्यांनी जम्मू-काश्मीरच्या सुरक्षा यंत्रणांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये त्यांनी दहशतवादाचा समर्थपणे मुकाबला करा आणि दहशतवाद्यांना मदत करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

Advertisement
Tags :

.