Sangli News : खानापूर रोडवर मोटारसायकल चोरणारे दोन संशयित जाळ्यात
सातारा पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे गुन्हे उघडकीस
विटा : मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन संशयितांना बिटा पोलिसांनी अटक केली आहे. सुशांत उत्तम सोनवणे (२५), शुभम किसन भिसे (१९ बर्षे, दोघेही रा. मायणी, ता. खटाव, जि. सातारा) अशी संशयितांची नावे आहेत. त्यांना बुधवारी १४ जानेवारी रोजी अटक केली आहे. त्यांच्याकडून १ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी बिपुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे, पोलीस निरीक्षक संजय हारुगडे, पोलिस हवालदार उत्तम माळी, विलास मोहिते, महेश देशमुख, महेश संकपाळ, अक्षय जगदाळे, अभिजीत पाटील, अजय पाटील यांच्या पथकाने
ही कारवाई केली.
खानापूर तालुक्यातील माहुली गावातुन २६ रोजी रात्री ११ ते २७ डिसेंबर २५ रोजीचे सकाळी ८.३० च्या दरम्यान होन्डा कंपनीची युनिकॉर्न मॉडेलची मोटारसायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे, अशी फिर्याद माहुली येथिल गणेश पांडुरंग माने यांनी विटा पोलिसात दिली होती.
पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी तपासाच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकमधील अंमलदार उत्तम माळी आणि महेश देशमुख यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली ककी, विटा येथील खानापूर रोड येथील शिलंगाण मैदान येथे दोन इसम बिनानंबरच्या मोटारसायकलसह बसले आहेत. पोलीस पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांना नाव विचारता त्यांनी सुशांत उत्तम सोनवणे आणि शुभम किसन भिसे (दोघे रा. मायणी, ता. खटाब, जि. सातारा) असे सांगितले. त्यांच्याकडील मोटारसाकलबाबत त्यांचेकडे चौकशी केली असता, ते प्रथम उडवाउडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी सदरची मोटारसायकल ही माहुली येथुन चोरी केली असलेची कबुली दिली. पोलीसांनी त्याचेकडे अधिक तपास केला असता, त्यांच्याकडुन आणखी तीन मोटारसायकली असा एक लाख ४८ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. असे एकुण त्यचिकडुन विटा पोलीस ठाणेकडील ४ गुन्हे उघडकीस आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.