For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Umarga stray bulls | उमरग्यात भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने; चारचाकी-दुचाकीचे नुकसान

03:42 PM Mar 01, 2026 IST | NEETA POTDAR
umarga stray bulls   उमरग्यात भररस्त्यात दोन मोकाट बैल आमने सामने  चारचाकी दुचाकीचे नुकसान
Advertisement

              उमरग्यात सार्वजनिक रस्त्यावर मोकाट जनावरांची समस्या वाढली

Advertisement

उमरगा - उमरगा शहरात बाळासाहेब ठाकरे चौकात भर रस्त्यात दोन मोकाट बैल आमने-सामने आले. यावेळी दोघांमध्ये झुंजीचा चांगलाच सामना रंगला.

भर रस्त्यात या दोन्ही बैलांनी अक्षरशः धुडगूस घातला होता. यामध्ये एक चार चाकी सह दोन दुचाकीचे नुकसान झाले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहने खोळंबली. भररस्त्यात त्यांची ही झुंज सुरु असल्याने बघ्यांची गर्दीही वाढली.

Advertisement

कधी रस्त्याच्या या बाजूला तर कधी त्या बाजूला असा त्यांचा मुक्त 'धिंगाणा' सुरु होता. तब्बल पंधरा मिनिट हा सगळा प्रकार सुरु होता. त्यामुळे पादचाऱ्यांसह दुचाकीस्वारांना रस्त्यात अडकून पडावे लागले.काही व्यापाऱ्यांनी भीतीने दुकाने बंद केली.

सार्वजनिक रस्त्यावर मोकाट जनावरे फिरणे कायद्याने गुन्हा ठरत असताना याची जबाबदारी नेमकी कोणाची, असा थेट प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. जनावरे पकडण्याच्या मोहिमा, गोठ्यांची व्यवस्था व मालकांवर दंडात्मक कारवाई हे उपाय केवळ कागदापुरतेच मर्यादित आहेत का, असा उपरोधिक सवालही नागरिकांनी केला.

Advertisement
Tags :

.